अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही घात झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ 


सोलापूर :  अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही एक दिवस घात झाल्याशिवाय राहणार नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी हे वक्तव्य केलं आहे. माझा हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहचू द्या आणि त्यांना रोहित दादांची कणव येऊ द्या असेही ते म्हणाले. अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला खंत वाटते की एक दिवस एकनाथ शिंदेंचांही ही असाच घात होईल असे ते म्हणाले. 

अजितदादांचा घात की अपघात ?

अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचा ही एक दिवस घात झाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी भाषण करताना केलं. यानंतर थेट उपस्थित त्यांना सवाल करीत अजितदादांचा घात की अपघात असे सांगत अजितदादांचा घात झाल्याचा दावा दत्ता मगर यांनी केला आहे. आपण या आंदोलनाच्या पाठीशी असून सर्वांनी याला साथ द्यावी असे म्हणत मगर यांनी थेट स्टेजवरच उपस्थित त्यांना दंडवत घातले. दत्तात्रय मगर हे माळशिरस पंचायत समिती मधील शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. माळशिरस पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता असूनही सभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेचे दत्ता मगर यांना देण्यात आले होते. 

जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिलीय

सत्तेत राहूनही रोहित पवारांना पाठिंबा दिल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, सत्तेचा जुगार सुरू आहे. पत्तेच्या पानाप्रमाणे जुगार सुरू आहे. आम्ही विरोधात आहोत, म्हणून आम्हाला मशिनने मतं दिली का? आम्ही शेण काढायचंच काम करायचं का? आम्हाला काही कामं नाहीत का? गोर गरीब जनतेची कामं करायची नाहीत का? प्रशासन चार वर्षे तुमच्या ताब्यात होतं. जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिलीय. पण निधीच देत नाहीत. 

नागपूर पोलिसांनी दाभा परिसरात धाड टाकून तीन देशी पिस्तूल, जिवंत काडतुस , तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी अब्बास सय्यद खान आणि ऋत्विक नाईक या दोन आरोपींना करण्यात आली अटक झाली आहे. आरोपी अब्बास हा दाभा रिंग रोडवरील एका कॅफेमध्ये देशी पिस्तुलासह थांबला असून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची पोलिसांना मिळाली होती. 

महत्वाच्या बातम्या:

Rajendra Pawar On Rohit Pawar: मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, राजेंद्र पवार भावूक, आंदोलनस्थळावरुन म्हणाले, सरकार धुंदीत धुंद!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *