Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, ‘मी रोहितचा बाप असलो तरी….’,


Rajendra Pawar Meet Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) रोहित पवारांनी (Rohit Pawar)  आंदोलन केलंय. मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, असं वक्तव्य रोहित पवारांचे वडिल राजेंद्र पवारांनी (Rajendra Pawar) म्हटलंय.. रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी इथे बसलोय असं राजेंद्र पवारांनी (Rajendra Pawar) म्हटलंय. जोपर्यंत शेतकरी व्यक्त होणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही, असंही राजेंद्र पवारांनी म्हटलंय. तर रोहित माझ्या किंवा त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसला नाहीये, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला (Rohit Pawar Hunger Strike) बसला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकाऱ्यांनी घरात बसावं कि रस्त्यावर उतरावं हे त्यांनी ठरवावं, असेही राजेंद्र पवारांनी (Rajendra Pawar)म्हटलंय.

Rohit Pawar : दिवसेंदिवस आंदोलनाची धार अधिक तीव्र

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसतेय. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे. आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar Hunger Strike : कोंडी फुटणार की आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार?

दुसरीकडे, सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. तर सध्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघेही सातत्याने रोहित पवार यांच्या संपर्कात आहेत. परंतु, रोहित पवार यांच्या मुख्य मागण्यांना अद्याप शासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली नाही. त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यात कोंडी फुटणार की रोहित पवार यांचं आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील प्रत्यक्ष भेटून आमदार रोहित पवारांना पाठिंबा देणार?

अशातच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पंढरपुर दौऱ्यावर आहेत.विशेष म्हणजे, आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी जरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर येत आहे. दरम्यान जरांगे पाटील समर्थकांनी आधीच रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता जरांगे पाटील प्रत्यक्ष भेटून आमदार रोहित पवारांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *