Popular Actress Exit From Kutumb Kirtan Natak: सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं ‘कुटुंब कीर्तन’ (Kutumb Kirtan) हे नाटक सध्या चर्चेत आहे एका वेगळ्याच कारणामुळे. गेल्या वर्षभरात संकर्षण कऱ्हाडे, वंदना गुप्ते, तन्वी मुंडले यांची या नाटकात प्रमुख भूमिका होती. पण आता नाटकातली लोकप्रिय अभिनेत्री तन्वी मुंडलेने (Tanvi Mundle) स्टार प्रवाहवरील मालिकेसाठी नाटक सोडलं आहे. तिच्या जागी आता नवी अभिनेत्री नाटकात दिसेल. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकात मोठा बदल होणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आता या व्यावसायिक नाटकात दिसणार आहे.
कुटुंब किर्तन नाटकातून तन्वी मुंडलेची Exit
गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकांची मराठी मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाहने नव्या कोऱ्या आठ मालिकांची घोषणा केली होती. यातीलच ‘विसरु नको तु मला ‘ या नव्या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले दिसणार आहे. तिने मालिका मिळाल्यामुळे कुटुंबकीर्तन नाटक सोडलं आहे. तिच्या जागी आता ‘रात्रीस खेळ चाले ‘ मालिकेतील देविका पात्र साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री नुपूर चितळे या नाटकात काम करणार आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीची नाटकात एन्ट्री
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागात अभिनेत्री नुपूर चितळेने काम केलं होतं.अभी रामच्या बायकोची भूमिका तिने साकारली होती.नंतर झी युवावरील फुलपाखरू मालिकेतही तिने काम केलं. तिने एनएसडीमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. ‘कुटुंब कीर्तन ‘ या व्यावसायिक नाटकातून ती पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या संदर्भात अलीकडेच नुपूरने पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने लिहिलं,’काळ्या पांढऱ्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांमध्ये एक वेगळाच रोमांटिकपणा असतो.लहानपणी पेपरात नाटक आणि सिनेमांच्या जाहिराती बघून मी आणि माझी ताई हीरोइनच्या साडीचा आणि हिरोच्या शर्टचा रंग ओळखायचा खेळ खेळायचो. आज त्याच जाहिरातींच्या पानावर स्वतःला पाहणं ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणतात ना, ‘आयुष्यातला पहिला अनुभव नेहमीच खास असतो.हा तोच अनुभव आहे. माझं पहिलं व्यावसायिक नाटक ! नक्की या .तुमच्या जवळच्या नाट्यगृहात भेटूच.असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं असून तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘कुटुंब कीर्तन ‘ हे सध्या रंगभूमीवर गाजणार मराठी कौटुंबिक नाटक आहे.आधुनिक कौटुंबिक जीवनातील गुंतागुंतीचे सुंदर चित्रण करणारे हे नाटक म्हणजे किर्रकिर्र करणाऱ्या नात्यांची कौटुंबिक कॉमेडी आहे. आजच्या जगात संयुक्त कुटुंबाची संकल्पना हळूहळू लुप्त होतं चाललेली असताना एकाच छताखाली राहून भावनिक अंतर वाढलं आहे.अशा घरांमध्ये जुन्या परंपरा आणि आधुनिक आकांक्षा यांचा संतुलन साधणं आव्हानात्मक बनलं आहे. ही कथा एका पारंपारिक कुटुंबात वाढलेल्या तरुणाची कथा सांगते. हे अतिशय मनोरंजक आणि विनोदी नाटक असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष