Nanded News : नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) डॉक्टर लेन शाखेत उघडकीस आलेल्या सुमारे लाखो रुपयांच्या बनावट सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा बँकेचा रोकड व्यवस्थापक आदित्य प्रकाश सेनगावकर याचा राजस्थानातील भरतपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून घोटाळ्याच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच जीवन जगदाळे पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र आदित्य सेनगावकर हा गुन्हा नोंदवण्यापूर्वीच नांदेडमधून बेपत्ता झाला होता. त्याच्या पत्नीनेही त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये तपास सुरू ठेवला होता. आदित्य सेनगावकर राजस्थानातील भरतपूर येथे असल्याची माहिती समोर आली. तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने आत्महत्या केलेली नसल्याचे अधिकृत सूत्राच्या माहितीवरून सांगण्यात आले घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असून मुख्य आरोपीच्या मृत्यूमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून आता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे उर्वरित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीन आहे.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या