खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर… – Marathi News | Shiv Sena UBT MP Sanjay Raut launched a scathing attack on the rebel MPs


सध्या राज्याच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मोठे धक्के बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आहेत.

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय?

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सहा खासदार निर्लज्ज आहे. गद्दार शब्दही कमी पडेल. हा लोकशाहीवरचा बलात्कार करून खून, गुन्हे घडतात ना, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहे सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलरही आहे लोकशाहीचे. ५० -५० कोटीला लोकं विकत घेत आहेत. लोकांना खायला मिळत नाही. लोक उपोषणाला बसले आहेत. यू आर सीरियल रेपिस्ट अँड सीरियल किलर आहात लोकशाहीचे.

पुढे ते म्हणाले, आम्ही देशभरात जाणार आहोत. राम रक्षा आंदोलन एकमेव लढा राहील. आमच्यासोबत ज्याला यायचं ते येतील. कालच्या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व लोक उपस्थित होते. काल फडणवीस आणि मोहन भागवतांना आमंत्रित केले होते. पण ते आले नाही. याचा अर्थ रामाचं मंदिर लुटणाऱ्यांना त्यांचा पाठिंबा आहे.

एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाही. आचार्यांप्रमाणे दाढी असली तरी ते विनोबा भावे नाही. ते बोलतील ते सत्य नाही. मशालीवर निवडून आलेले सहा लोकं तुम्ही ५० कोटीला विकत घेतले. निर्लज्ज, गद्दार आहेत. चांगले की वाईट सोडून द्या. विकत घेता यात कोणतं आलं शौर्य, मर्दुमकी आणि नित्तीमत्ता. याचं उत्तर द्यावं. आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. मतं उद्धव ठाकरेंना पडली. मशालीला पडली. तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही. तुम्ही काय आम्हाला सांगता. एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल. लक्षात घ्या. आय रिपीट ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरून हात फिरवून तुम्ही आम्हाला नित्तीमत्ता शिकवू नका. तुमची जी काही आहे ती अमित शाह यांच्या पायाशी आहे. तुम्हाला नित्तीमत्ता नव्हती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *