मोठी बातमी! रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल, पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना, खलील शेख प्रकरणात मोठी अपडेट.. – Marathi News | Ravindra Dhangekar and Pratibha Dhangekar could face arrest in the builder Khalil Shaikh case police team has been dispatched


पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणारे बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केली. आत्महत्या कपण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आणि चिठ्ठीही लिहिली. खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. थेट पुण्यातील बडे नेते अडचणीत आलीत. पोलिसांनी या प्रकरणात कोणाचीही गय न करता गुन्हे दाखल केले. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी गंभीर आरोप करत थेट व्हिडीओमध्ये नेत्यांसह नगरसेवकांची नावे घेतली. व्हिडिओ आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांकडून थेट कारवाई केली जात आहे. खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धगेंकर आणि त्यांच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. यादरम्यानच आता अटक टाळण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नॉट रिचेबल आहेत. त्या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सोमवारी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल.

त्यापूर्वीच पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी अज्ञातस्थळी गेले. धंगेकर यांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथकही रवाना झाले. खलील शेख यांनी व्हिडीओ तयार करत रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, वर्षा शेडगे यांच्यासह काहींचे नाव घेत त्यांनी आपल्या आत्महत्येकरिता या लोकांना जबाबदार धरले.

स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांना अटक होते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फक्त चिठ्ठीच लिहिली नाही तर त्यांनी ज्या इमारतीमध्ये त्यांनी आत्महत्या केली त्या इमारतीच्या चारही बाजूने बाहेरून चिठ्ठी लिहून चिटकवली. यासोबतच पोलिसांनी खलील शेख यांच्या खिशातही चिठ्ठी सापडली. आता या प्रकरणात रवींद्र धंगेकरसोबत त्यांच्या पत्नीवरही अटकेची तयार लटकली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *