CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल


मुंबई : CJPच्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा तसेच परवानगीशिवाय आंदोलन (CJP Protest in Mumbai) केल्याचा आरोप ठेवत 900 हून अधिक आंदोलकांना (CJP Protest in Mumbai) विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वाधिक 600 हून अधिक जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. तर माहिम पोलीस ठाण्यात 100 हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात 70 हून अधिक आणि सायन पोलीस ठाण्यात 40 हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.(CJP Protest in Mumbai)

CJP Protest in Mumbai : बंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र FIR नोंदविण्यात आलेत

याशिवाय वरळी पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात, काळाचौकी पोलीस ठाण्यात 20 हून अधिक, भोईवाडा पोलीस ठाण्यात 20 हून अधिक तसेच वडाळा टीटी पोलीस ठाण्यात 25 हून अधिक आंदोलकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील विविध ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र FIR नोंदविण्यात आल्या असून, सर्व प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.(CJP Protest in Mumbai)

CJP Protest in Mumbai : आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची पोलीस परवानगी घेण्यात आली नव्हती?

चैत्यभूमीवरील CJP आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई करत 3 गुन्हे दाखल केले आहेत, 50 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. दादर येथील चैत्यभूमीवर झालेल्या CJPच्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.  या प्रकरणात 50 हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची पोलीस परवानगी घेण्यात आली नव्हती. परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे आणि कायदा व सुव्यवस्था भंग झाल्याच्या आरोपावरून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.(CJP Protest in Mumbai)

PM Modi on Neet Exam Paper: नीट परीक्षेबाबत नेमकं काय काय म्हणाले मोदी?

नीट परीक्षेबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, जेव्हा पेपर लीकची बातमी समोर आली, तेव्हा सरकारने तत्काळ कारवाई करत १३ जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी नीट (NEET) पुनर्परीक्षेला प्राधान्य देण्यात आले आणि ही पुनर्परीक्षा यशस्वीपणे पार पाडून तिचा निकाल जाहीर करण्यात कोणताही विलंब केला गेला नाही. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्यात आली आहेत. पेपर लीकच्या धंद्यात जे लोक लिप्त आहेत आणि दोषी आढळल्यामुळे ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वोच्च दर्जाच्या वकिलांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे; जेणेकरून पेपर लीकसारखे पापकृत्य करणाऱ्यांना कडक शासन मिळेल. पुढे असा पेपर लीक रोखण्यासाठी उचललेल्या ठोस पावलांची माहिती देताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हा केवळ एका राज्याचा किंवा फक्त केंद्र सरकारचा विषय नाही, तर संपूर्ण देशाचा विषय आहे. देशातील ज्या ज्या राज्यात पेपर लीक प्रकरणात लोक लिप्त आहेत, ज्यांनी हे घाणेरडे पापकृत्य केले आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशाचा आणि तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. त्यामुळे युवकांच्या भविष्याशी कोणीही खेळ करू नये यासाठी कडक पावले उचलून दोषींना शिक्षा दिली पाहिजे आणि एक दोषरहित (Foolproof) परीक्षा यंत्रणा तयार करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *