Lionel Messi Crying : फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर लियोनेल मेसीच्या अश्रूचा बांध फुटला, VIDEO – Marathi News | After lost from spain in fifa world cup 2026 final argentina great player ionel messi cries


सलग दुसऱ्यांदा फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न स्पेनने उधळून लावलं. रविवारी 19 जुलैला न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. फायनल सामना अपेक्षेप्रमाणे रोमांचक झाला. स्पेनने एक्स्ट्रा टाइममध्ये 1-0 ने विजय मिळवला. फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याची स्पेनची ही दुसरी वेळ आहे. मॅच संपल्यानंतर खूप भावनिक क्षण पहायला मिळाला. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेसीच्या अश्रुचा बांध फुटला. शेवटची शिटी वाजताच मेसी मैदानातच गुडघ्यावर बसला. त्याचे डोळे भरुन आलेले. मेसी आता 39 वर्षांचा आहे. त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांनी ‘मेसी…मेसी..’ च्या घोषणा देत या महान खेळाडूचा सन्मान केला. अनेक फॅन्सनी पोस्टर आणि प्लेकार्ड दाखवून या महान खेळाडूला निरोप दिला. फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये निर्धारित 90 मिनिटांचा खेळ गोल शून्य बरोबरीत सुटला. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. तिथे स्पेनचा सब्स्टीट्यूट फेरान टोरेसने हुशारी दाखवली. त्याने रिबाऊंडवर सर्वात आधी पोहोचून चेंडूला गोल जाळ्याची दिशा दाखवली. हाच गोल सामन्यामध्ये निर्णायक ठरला. स्पेनने दुसऱ्यांदा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला.

फेरान टोरेसच्या गोलने सामन्याचा निकाल

अर्जेंटिनाला सर्वात मोठा झटका निर्धारित वेळेच्या इंजरी टाइममध्ये बसला. मिडफील्डर एंजो फर्नांडेजला दुसरं यलो कार्ड मिळाल्यानंतर रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यानंतर लियोनेल स्कालोनीच्या टीमला संपूर्ण एक्स्ट्रा टाइममध्ये 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. स्पेनच्या अतिरिक्त खेळाडूने फायदा उचलत दबाव कायम ठेवला. 115 व्या मिनिटापर्यंत गोलसाठी एकही शॉट लागला नाही. अखेरीस फेरान टोरेसच्या गोलने सामन्याचा निकाल लागला.

लियोनेल मेसीच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड

भले अर्जेंटिना वर्ल्ड कप जिंकण्यात कमी पडली असेल, पण लियोनेल मेसीने आपल्या नावावर एक मोठा रेकॉर्ड केला. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात तीन फायनल खेळणारा मेसी दुसरा खेळाडू बनला आहे. त्या शिवाय वयाच्या 39 व्या वर्षी वर्ल्ड कप फायनल खेळणारा सर्वात वयोवृद्ध आऊटफिल्ड खेळाडू ठरला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *