Sonam Wangchuk: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील कॉकरोच जनता पार्टी आणि नीटच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी सोनम वांगचूक यांना बळजबरीने जंतरमंतरवरुन उचलून सफदरगंज रुग्णालयात भरती केले होते. यानंतर त्यांची पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने सोनम वांगचूक यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्लीतील मेदांता (Medanta Hospital) या खासगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.
सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आपल्या सरकारी यंत्रणांवर विश्वास नसल्याचे सांगत आपल्या पतीला सफदरगंज रुग्णालयातून हलवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरगंज रुग्णालयात जबरदस्तीने आणले होते. त्यांना ज्या मजल्यावर ठेवले होते, तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सोनम वांगचूक यांच्या भेटीगाठींवर निर्बंध लादण्यात आले होते. याविरोधात त्यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली आहे. तसेच, त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे विशेष पॅनल स्थापन करण्याचे निर्देश रुग्णालयाला दिले आहेत.न्यायालयाने स्पष्ट केले की, वांगचूक यांचे सर्व वैद्यकीय अहवाल (Medical Reports) या डॉक्टरांच्या पॅनलसोबत सामायिक (Share) केले जावेत. केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले की, वांगचूक यांनी स्वतःच्या पसंतीचे रुग्णालय आणि डॉक्टर निवडण्यास सरकारची कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीची चिंता लक्षात घेता, डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, अशी विनंती केंद्र सरकारने केली होती. वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांशी झालेल्या चर्चेवरून सोनम वांगचुक यांच्यावर सतत लक्ष ठेवणे (Monitoring) गरजेचे आहे, तसेच त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार केले जाऊ शकतात, यावर एकमत झाल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.
Plea filed by Sonam Wangchuk’s wife, Dr Gitanjali Angmo, challenging Single Judge’s order refusing to shift him from Safdarjung Hospital to a private hospital of his choice | Delhi High Court – the Centre has no objection to shifting Sonam Wangchuk to Medanta Hospital, SG Tushar…
— ANI (@ANI) July 21, 2026
आणखी वाचा
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप