Kalyan News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात इमारत कोसळली आहे. यावेळी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून महिलेनं चक्क उडी मारली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनीषा मोरे असं या महिलेचं नाव आहे.
री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा एक मोठा भाग अचानक कोसळला
कल्याणमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली. यावेळी एका महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता थेट खिडकीतून बाहेर उडी मारली आहे. कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा एक मोठा भाग आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी अचानक थेट भर रस्त्यात कोसळला. इमारत कोसळत असतानाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता थेट खिडकीतून बाहेर उडी मारली
या दुर्घटनेच्या वेळी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. इमारतीचा भाग कोसळत असताना, तिथे उपस्थित असलेल्या मनीषा मोरे नावाच्या महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता थेट खिडकीतून बाहेर उडी मारली. सुदैवाने त्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे त्या बालंबाल बचावल्या आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. री-डेव्हलपमेंटचे पाडकाम सुरू असताना संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आली नव्हती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे विकासकाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ टळला मोरे कुटुंब यातून वाचले
दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहेत. त्यामुळे आता या घटनेवर प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे केडीएमसी महापालिकाचे अधिकारी आणि विकासक यांच्यात याबाबतची कारवाई करताना समन्वय होते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच या भयावह घटनेत कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. संबंधित घटना ही दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. रि-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से