पार्सल द्यायला आला अन् घरात घुसला, डिलिव्हरी एजंटचं महिलेसमोर घाणेरडं कृत्य, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला Video | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी एजंटने महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. हा डिलिव्हरी एजंट जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसला ज्याच्या व्हिडिओ महिलेने रेकॉर्ड केला आहे.

पार्सल द्यायला आला अन् घरात घुसला, डिलिव्हरी एजंटचं महिलेसमोर घाणेरडं कृत्य, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला Video
पार्सल द्यायला आला अन् घरात घुसला, डिलिव्हरी एजंटचं महिलेसमोर घाणेरडं कृत्य, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला Video

मुंबई : ऑनलाईन ऍपवरून आपण रोजच्या वापराच्या वस्तू सर्रास मागवतो. ऑर्डर केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये या वस्तू डिलिव्हरी एजंट तुमच्या घरापर्यंत आणून देतात, पण काही वेळा यामुळे सुरक्षेचे प्रश्न उपस्थित होतात. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत अशाच एका डिलिव्हरी एजंटने धक्कादायक कृत्य केलं आहे. या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. डिलिव्हरी एजंटने पार्सल दिल्यानंतर महिलेकडे वॉशरूम वापरण्याची विनंती केली, पण महिलेने नकार दिल्यानंतर हा डिलिव्हरी एजंट जबरदस्तीने घरात घुसला आणि वॉशरूमला गेला आणि घाणेरडं कृत्य केलं, असा आरोप महिलेने केला आहे.

काय म्हणाली महिला?

‘मी मागवलेलं पार्सल घेऊन डिलिव्हरी एजंट आला, यानंतर त्याने मला वॉशरूम वापरू शकतो का? असं विचारलं. मी त्याला नकार दिला कारण मी घरात एकटी होते. अनोळखी व्यक्तीला मी घरात येऊ देत नाही. मी नकार दिलेला असताना त्याने चप्पल काढली आणि जबरदस्तीने माझ्या घरात घुसला. यानंतर मी लगेचच कॅमरा सुरू केला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरूवात केली. माझ्या घरात घुसून डिलिव्हरी एजंटने अश्लिल कृत्य केलं’, असा आरोप महिलेने केला आहे. या आरोपीचं नाव विजय मल्लिकार्जुन कामथ असं आहे.

फ्लिपकार्टने कामावरून काढलं

महिलेने व्हिडिओमध्ये हा पूर्ण घटनाक्रम सांगितला, त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी एजंटला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फ्लिपकार्टनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा आम्हालाही त्रास झाला असून आम्ही आमच्या ग्राहकाला पूर्ण सहयोग देत आहोत. ग्राहकाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. या डिलिव्हरी पार्टनरला आम्ही कामावरून काढून टाकलं आहे, असं स्पष्टीकरण फ्लिपकार्टने दिलं आहे.

डिलिव्हरी एंजटविरोधात एफआयआर

फ्लिपकार्टने एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपी डिलिव्हरी एजंटला अटक करण्यात आली आहे. सर्व डिलिव्हरी एजंटना कामावर ठेवण्याआधी आम्ही त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतो तसंच त्यांना अनिवार्य ट्रेनिंगही देतो. अशा घटना खूप कमी होतात, पण त्याचादेखील स्वीकार केला जाऊ शकत नाही, असं फ्लिपकार्टकडून सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/देश/

पार्सल द्यायला आला अन् घरात घुसला, डिलिव्हरी एजंटचं महिलेसमोर घाणेरडं कृत्य, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *