Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव


भारतीय वाहन उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उद्योगपती अरुण फिरोदिया यांना उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्यपूर्ण योगदान देत त्यांनी भारतीय उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दीर्घकालीन कार्याचा आणि उद्योगक्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.

एबीपी माझा ‘माझा सन्मान पुरस्कार 2026’ सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री सई ताम्हणकर, गायिका प्रियांका बर्वे, ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे, उद्योगपती अरुण फिरोदिया, युवा उद्योजक अर्जुन देशपांडे, तसेच आदिवासी भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था यांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कला, क्रीडा, उद्योग, उद्योजकता, सामाजिक कार्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा हा सन्मान सोहळा एबीपी माझाच्या वतीने उत्साहात पार पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *