Ishwarpur : जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जलदगती’ने निकाल


Ishwarpur Municipal Council Disqualification Row : दोनच दिवसांपूर्वी (11 जुलै) ईश्वरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपात्र केल्यानंतर आता सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांना आणखी एक धक्का दिला आहे. जयंत पाटील गटाच्या आणखी एका नगरसेवकाला अवैध बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं आहे. सुनील मलगुंडे असं त्या नगरसेवकाचं नाव असून ते अपात्र ठरलेले नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे बंधू आहेत. त्यामुळे दोन्ही भावांना अपात्र ठरवल्याने आता त्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. 

नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवण्यात आलं आहे. सुनील मलगुंडे यांनी मिळकतीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय दिला. 

सुनील मलगुंडे हे ईश्वरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनाही अवैध बांधकाम प्रकरणातच अपात्र ठरवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मात्र जयंत पाटील यांनी होमग्राऊंडवर पुन्हा एकदा विजय मिळवला. 

Ishwarpur Municipal Council Result : ईश्वरपूरचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी (शरद पवार) – 22

भाजप – 3
राष्ट्रवादी (अजित पवार) – 3
शिवसेना – 2

Ishwarpur Municipal Council News : नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून त्यावर अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याचं दिसून आलं. आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जयकुमार जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता.

आता या प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊन सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी आधी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर त्यांचे बंधू नगरसेवर सुनील मलगुंडे यांच्यावरदेखील अपात्रतेची कारवाई केली आहे. 

नगराध्यक्षानंतर नगरसेवकपदही अपात्र झाल्याने तो जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या दोन्ही पदांसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणूक पार पडणार हे निश्चित. त्यामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *