आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत! स्वतःच सांगितलं संपूर्ण वेडिंग प्लॅनिंग, कुठे पार पडणार शाही सोहळा? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Gauri Spratt-Aamir Khan wedding: आता येत्या काही दिवसातच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून नुकतंच आमिरने मीडियासमोर आपल्या तिसऱ्या लग्नाचं प्लानिंग सांगितलं आहे.

News18
News18

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या कोणत्याही फिल्ममुळे नाही, तर त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची मीडियाशी ओळख करून दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या अफवा सुरू होत्या. अशातच, आता येत्या काही दिवसातच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून नुकतंच आमिरने मीडियासमोर आपल्या तिसऱ्या लग्नाचं प्लानिंग सांगितलं आहे.

स्वतः आमिर खानने त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर पूर्णविराम दिलं असून एका कार्यक्रमादरम्यान त्याने आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करत, चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

आमिरने सांगितलं कुठे होणार लग्न?

नुकत्याच पार पडलेल्या ‘प्रितम अँड पेड्रो’शी संबंधित एका कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. तिथे पत्रकारांनी त्याला गौरी सोबतीच्या लग्नाच्या चर्चांबद्दल थेट प्रश्न विचारला. नेहमीप्रमाणेच प्रश्नांना न टाळता आमिरने हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिले, “होय, खरं आहे. मी येत्या ५ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न घरीच अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने होणार असून, दोन्ही बाजूचे मोजकेच कुटुंबीय यावेळी उपस्थित असतील.”

आमिरने ही घोषणा करताच तिथे उपस्थित असलेले त्याचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी तात्काळ उठून आमिरला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. आमिर पुढे म्हणाला, “५ जुलै हा दिवस आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्हा दोघांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रार्थनांची गरज आहे.”

थाटमाट नाही, घरगुती पद्धतीने होणार लग्न

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचे नाते गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनले होते. आमिरच्या या लग्नाची तारीख आधीच लीक झाली होती, पण त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. बॉलिवूडमधील इतर कलाकारांप्रमाणे कोणतेही भव्यदिव्य डेस्टिनेशन वेडिंग किंवा थाटमाट न करता, आमिरने हे लग्न अगदी लो-प्रोफाइल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही गदारोळाशिवाय, घरातल्या घरात आणि अत्यंत जवळच्या लोकांच्या साक्षीने आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या आयुष्याची ही नवी इनिंग सुरू होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत! स्वतःच सांगितलं संपूर्ण वेडिंग प्लॅनिंग, कुठे पार पडणार शाही सोहळा?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *