फिफा वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जयस्वालचं कोणत्या संघाला पाठिंबा? व्हिडीओ शेअर करत स्वत:च सांगितलं Image Credit source: PTI
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार रंगला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर काही संघांचं स्वप्न भंगणार आहे. तर काही संघांची जेतेपदाची शर्यत कायम राहणार आहे. या स्पर्धेच्या बाद फेरीत दिग्गज संघांनी एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा आणि प्रोत्साहान देण्याची संधी क्रीडाप्रेमी सोडत नाहीत. भारतीय फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. पण भारतातही फुटबॉलचे अनेक चाहते आहेत. रात्रभर जागून स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा देत आहेत. असं असताना भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत यशस्वी जयस्वाल अर्जेंटीनाच्या जर्सीत दिसत आहे. म्हणजेच यशस्वी जयस्वाल गतविजेत्या अर्जेंटीना संघाचा पाठिंबा देत आहे. म्हणजेच मेस्सीचा चाहता आहे हे स्पष्ट आहे.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान यशस्वी जयस्वालने अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीच्या 10 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. पण जयस्वाल मेस्सीचा संघ अर्जेंटीनाला पाठिंबा देण्यासाठी गेला नव्हता. यशस्वी जयस्वाल फ्रान्स आणि स्वीडन सामना पाहण्यासाठी गेला होता. हा सामना 30 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात फ्रान्सने स्वीडनला 3-0 ने पराभवाची धूळ चारली. यासह राउंड ऑफ 16 मध्ये जागा पक्की केली. जयस्वालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ क्लिप शेअर करत त्यावर एक पोस्ट लिहिली आहे.
यशस्वी जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिलं की, बकेट लिस्ट.. म्हणजेच फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील सामना लाईव्ह पाहण्याची त्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. गतविजेचा अर्जेंटीना संघाने राउंड ऑफ 32 मध्ये जागा पक्की केली आहे. अर्जेंटीनाचा या फेरीत सामना काबो वर्डे या संघाशी होणार आहे. या स्पर्धेत बाद फेरीत जागा मिळवणारा सर्वात छोटा देश आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत कोण बाजी मारते आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा सामना 4 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजता होणार आहे.