मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मुंबईला पोहोचणं आणखी सोपं होणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता दादर-भुसावळ खान्देश एक्स्प्रेससंदर्भात रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 19003/19004 दादर भुसावळ खान्देश एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. खान्देश एक्स्प्रेस आता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
डीआरएम भुसावळ यांच्याकडून एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार दादर भुसावळ खान्देश एक्स्प्रेस 1 ऑगस्ट 2026 पासून आठवड्यातील सहा दिवस धावेल. फक्त शुक्रवारी ही एक्स्प्रेस धावणार नाही. 19004 भुसावळ- दादर खान्देश एक्स्प्रेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल. तर, 19003 दादर- भुसावळ खान्देश एक्स्प्रेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवारी आणि रविवारी धावेल.
महाराष्ट्रातील दोन थांबे वाढवले
दादर- भुसावळ खान्देश एक्स्प्रेसचे राज्यातील दोन थांबे वाढवण्यात आले आहेत. बोईसर आणि डहाणू रोड या स्टेशनवर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.
खान्देश एक्स्प्रेसचे प्रमुख थांबे
बोरीवली, विरार, पालघर, बोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, चलथान, बार्डोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेड़ा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव आणि जळगाव
दादरहून भुसावळला जाणारी खान्देश एक्स्प्रेस मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी दादर स्टेशनवरुन सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी 12 वाजता भुसावळला पोहोचेल. खान्देश एक्स्प्रेस 11 तास 55 मिनिटांमध्ये भुसावळला पोहोचेल. तर, भुसावळवरुन सांयकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी खान्देश एक्स्प्रेस सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5.15 मिनिटांनी दादर स्टेशनला पोहोचेल.
नोकरीनिमित्त उत्तर महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. विविध परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याची भावना उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
🚆 रेलवे प्रशासन ने यात्रियों की बढ़ती यात्रा मांग एवं बेहतर सुविधा को ध्यान में रखते हुए *ट्रेन संख्या 19003/19004 दादर–भुसावल खान्देश एक्सप्रेस* के फेरों में महत्वपूर्ण वृद्धि करने का निर्णय लिया है।
📅 *1 अगस्त 2026 से यह ट्रेन त्रि-साप्ताहिक के स्थान पर सप्ताह में 6 दिन… pic.twitter.com/YMSX020Mr5
— DRM Bhusaval (@BhusavalDivn) July 2, 2026
आषाढी वारीनिमित्त उधना – मिरज विशेष गाडीच्या चार फेऱ्या
आषाढी एकादशी निमित्त रेल्वेची भाविकांसाठी विशेष गाडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी भाविकांच्या सोयीचा विचार करून उधना – मिरज विशेष गाडी (एकूण ४ फेऱ्या) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 23 जुलै ते 25 जुलै दरम्यान 4 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत
गाडी क्रमांक 09071 (उधना – मिरज)
23 व 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 06.45 वाजता
गाडी क्रमांक 09072 (मिरज – उधना)
24 व 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 08.40 वाजता
थांबे : चलथान, बार्डोली, व्यारा, उकाई सोनगढ, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, पाळधी, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर.
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!