विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
