नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांनी नीट यूजी परीक्षेच्या पेपरफुटीमुळं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण सुरु केलं आहे. वांगचुक यांची प्रकृती उपोषणामुळं खालावली असून देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून उपोषण सोडण्याची त्यांना विनंती करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी वांगचुक यांना समर्थन दिलं असून उपोषणं मागं घेण्यांच आवाहन केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी देखील उपोषण स्थळी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. काँग्रेसकडून देखील वांगचुक यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहनं करण्यात आलं आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि के.सी. वेणुगोपाल यांनी वांगचुक यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहन केलं आहे.
वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं: के.सी. वेणुगोपाल
नवी दिल्लीतील जंतरमतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. अनेक नेत्यांकडून वांगचूक यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहन करण्यात आलं. ते म्हणाले की सोनम वांगचुक केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 19 दिवसांपासून आमरणे उपोषण करत आहेत. काँग्रेसकडून दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळं आणि परीक्षा पद्धती उद्धवस्त होत असल्याबाबत आम्ही वांगचुक यांचं दु:ख आणि संताप समजू शकतो. मात्र, वांगचुक यांनी प्रकृती पाहता उपोषण संपवावं. आम्हाला आणि इतर विरोधी पक्षांना त्यांची काळजी असल्याचं के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी केंद्र सरकारसोबत संघर्ष सुरु ठेवू, असं वेणुगोपाल म्हणाले.
Shri Sonam Wangchuk has now been on a hunger strike for 19 days, demanding the resignation of the Union Education Minister.
The Indian National Congress has been making this very demand for over a month and a half. We share the anguish and outrage that Shri Wangchuk ji feels,…
— K C Venugopal (@kcvenugopalmp) July 16, 2026
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. दिल्ली हायकोर्टानं सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आवश्यकता असल्यास वांगचुक यांच्यावर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टरांनी वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सोनम वांगचुक लडाखमधील प्रसिद्ध इंजिनिअर, पर्यावरणवादी आहेत. 2009 मध्ये रिलीज झालेला थ्री इंडियट्स या चित्रपटातील फुंगसुक वांगडू हे पात्र वांगचुक यांच्यापासून प्रेरित आहे. वांगचुक यांनी लढाखमध्ये स्टूडंट एजुकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख नावाची संस्था बनवली होती, ही संस्था पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 20 जुलै रोजी नवी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?