दुबईला लोक इन्कम टॅक्स फ्री सिटी म्हणतात. मात्र, आता भारतातील उत्तर पूर्वीतील हिमालयाच्या रांगामधील दुसरे सर्वात छोटे आणि निसर्गरम्य राज्य असलेले सिक्कीम येथे इन्कम टॅक्स घेतला जात नाही.
सिक्कीम राज्यात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कांचनजुंगा नॅशनल पार्क आहे. सिक्कीम राज्य जगातील पहिले १०० टक्के ऑर्गेनिक स्टेट म्हटले जाते. येथे शेतकरी पिकांना रासायनिक खते आणि किटकनाशकांऐवजी नैसर्गिक खते वापरतात.
सिक्कीम राज्यातील पात्र नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.त्यामुळे येथील नागरिकांना त्यांची कमाई बिनधास्त करता येते. त्यांना सरकारला आयकर भरावा लागत नाही. येथील उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
सिक्कीम हे १६ मे १९७५ रोजी भारताचे २२ वे राज्य बनले. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी आहे. या राज्याच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला आणि पूर्वेला चीन (तिबेट), आणि आग्नेयेला भूतान. दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य आहे.
सिक्कीम येथील ( कांचनजंघा – Kanchenjunga National Park ) (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट आणि के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तसेच सिक्कीम लोक या शिखराला पवित्र मानतात.




