Wardha: पाऊस मस्त पडतोय, धरणावर फिरायलं जाणे जीवावर बेतलं, डोळ्यासमोर 2 मित्रांना गमावलं! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

वर्ध्यातील चार जण सेलू तालुक्यातील रिधोरा येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. परिसरात फेरफटका मारल्यानंतर

News18
News18

वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  वर्ध्याच्या रिधोरा येथील धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या रिधोरा धरणामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  वर्ध्यातील चार जण सेलू तालुक्यातील रिधोरा येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. परिसरात फेरफटका मारल्यानंतर धरणामध्ये चौघे जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. काही वेळानंतर थोड दूर गेल्यानंतर अचानक चारही जण बुडायला लागले. यात दोघे जण कसं बसं वाचेल. पण, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

स्थानिकांनी धाव घेऊन दोघांना बाहेर काढलं पण दोन जण धरणात बुडून गेले. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनेच दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे.  घटनेचा पुढील तपास सेलू पोलिस करत आहे.

तलावामध्ये बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दरम्यान, नवी मुंबईतील  खारघरमध्ये अशीच एक घटन घडली. भारती विद्यापीठामागील तलावात १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. आश्रफ शेख असं मयत तरुणाचं नाव आहे.  धारावी येथून मित्रांसह खारघर डोंगर परिसरात फिरण्यासाठी आला होता.

मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण भरून वाहत होता. पोहण्यासाठी तलावात उतरल्यावर खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. स्थानिकांनी व मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला. पावसाळ्यात खारघर डोंगर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने पुन्हा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल आहे.  घटनेचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *