आमदार सचिन तेंडूलकर… एकनाथ शिंदे यांचे विधान ऐकताच एकच हशा, सचिन आहिर यांच्या.. – Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde made significant statement regarding Sachin Ahir candidacy


आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन आहिर यांनी अर्ज दाखल केला. आज सकाळपर्यंत विधान परिषदेच्या उपसभापतीच्या शर्यतीमध्ये वेगळ्या नावांची चर्चा होती. अचानक सचिन आहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना म्हणावा लागेल. वरळी मतदार संघात सचिन आहिर यांचे मोठे वर्चस्व बघायला मिळते. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता सचिन आहिर यांनीही थेट बंडखोरी केली. दोन आठवड्यात दुसरा हा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला. 6 खासदारांनंतर एकनाथ शिंदेंच्या गळ्याला सचिन आहेर लागले. ठाकरेंना हा आणखीन एक दणका बसला. बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंनी दाैरे केले. मुंबईत परतताच त्यांना हा मोठा झटका बसला.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आमदार सचिन तेंडुलकर…  एकनाथ शिंदे यांनी आमदार सचिन तेंडुलकर म्हणताच एकच हशा उडावा. एकनाथ शिंदे यांनी सचिन आहिर म्हणण्याऐवजी सचिन तेंडुलकर म्हटले, यावेळी उपस्थित सर्वांना हसू आवरले नाही. एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, सचिन अहिर यांनीही आज षटकार मारला. सहा खासदारांनी गेल्या आठवड्यात षटकार ठोकला. सहा मतदारसंघात काही लोकं जाऊन आले.

त्यांचं अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय. चौकार षटकरा सुरू आहे. राहतील. एक एक विकेट पडत जाईल. हा क्रिकेटचा गंमतीचा भाग जाऊ द्या. सचिन अहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधान परिषदेचे आमदार आहेत. राज्यमंत्री होते. सात विभाग त्यांच्याकडे होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलंत.

अनेक संघटनांमध्ये काम केलं. कोळीवाडा, मूळ मुंबईकर भूमिपूत्रांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी सचिन आहिर यांच्या विधान परिषदेच्या उपसभापतीच्या अर्जानंतर पत्रकार परिषद घेत यावर थेट भाष्य केले. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *