Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल


Running Your AC in Rainy Season monsoon: पावसाळ्यात रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळतो. पण वातावरणातील दमटपणामुळे घरात ओलावा राहतो. लोकांना याचा त्रास होतो. दरम्यान, यातून सुटका मिळवण्यासाठी आपण घरात एसीचा वापर करतो. बरेच लोक उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही त्याच पद्धतीने एसीचा वापर करतात. त्याच तापमानावर एसी चालवतात. पण योग्य तापमानात एसीचा वापर केल्यास घरात चांगला थंडावा राहतो. तसेच विजेचे बिल कमी होण्यासही मदत होते.

पावसाळ्यात नेमकं किती तापमानावर एसी चालवावे? कोणत्या तापमानात एसी चालवल्याने फायदा होतो? जाणून घेऊयात.

ड्राय मोडचा वापर करा (These 3 Simple Tips Can Reduce Your Electricity Bill)

उन्हाळ्यात उन्हाचे चटके लागतात. पण पावसाळ्यात हवेत खूप दमटपणा असतो. रिमोटवरील मोड हे ड्राय मोडवर सेट करा. त्याचे रिमोटवर चिन्ह पाण्यासारखे दिसते. या मोडमुळे खोलीतील आद्रता आणि ओलावा दूर होते. खोलीतील दमटपणाही दूर होतो. यांसह विजेचीही बचत होते.

एसी कितीवर सेट करावे? (Using an AC during the monsoon)

दमटपणामुळे खोलीत ओलावा निर्माण होतो. त्यामुळे एसीचे टेम्परेचर व्यवस्थित सेट करायला हवे. बरेच लोक एसी 16 किंवा 18 वर सेट करतात.  पण ही चूक तुम्ही करणं टाळा. यामुळे विजेचा अधिक प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शक्यतो एसीचे तापमान 24 किंवा 26 टेम्परेचरवर ठेवा. यामुळे आपल्याला घरात थंडी जाणवेल. तसेच कम्प्रेसरवर जास्त ताण येणार नाही.

एअर फिल्टर कायम स्वच्छ ठेवा (Ac Air Filter in Monsoon)

एसीचे फिल्टर कायम स्वच्छ ठेवा. घाणेरड्या फिल्टरमुळे विजेचा जास्त वापर होतो. तसेच हवा खेचण्यासही मशीनला जास्त मेहनत घ्यावी लागते. पावसाळ्यातील शक्यतो हवेतील धूळ सनी आद्रता एसी खेचून घेते. फिल्टर होऊन शुद्ध हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे दर महिन्याला एसी स्वच्छ करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *