Bigg Boss Fame Palak Purswani Marries Long Time Boyfriend Rohan Khanna: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम पलक पुरसवानी सध्या आपली पर्सनल लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे. तिचं नुकतच लग्न झालं आहे. लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड रोहन खन्ना याच्याशी तिने साताजन्माची गाठ बांधली आहे. सध्या तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडेच पलकने आपल्या लग्नातील अन्सीन व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
पलकचा लग्नातील व्हिडीओे सोशल मीडियात व्हायरल (Palak Purswani Marries Long Time Boyfriend Rohan Khanna)
व्हायरल व्हिडीओमध्ये पलक लाल जोड्यामध्ये दिसत आहे. नववधू या खास – स्पेशल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकने सर्वांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओत पलक मंडपात येत असल्याचे दिसत आहे. नववधूला पाहिल्यानंतर नवरदेवाला अश्रू अनावर झाले. पलकला पाहताच रोहन आपल्या इमोशन्सवर कंट्रोल करू शकला नाही. त्याला अचानक रडू कोसळलं. यानंतर नवरदेव आपले डोळे पुसताना व्हिडीओत दिसला.
पलक पुरसवानीने अलिकडेच लग्नगाठ बांधली (Bigg Boss Fame Palak Purswani tied knot with rohan)
नवरदेवाला रडताना पाहून पलकने रोहनला शांत केलं. तसेच त्याला जवळ घेऊन प्रेमाने किस केलं. नंतर व्हिडीओमध्ये सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आदियोगी मूर्तिसमोर पलक नवरदेवासोबत स्टेजवर बसलेली दिसत आहे. रोहन पलकचे लाड करताना दिसत आहे. दोघेही आपल्यात लग्नात आनंदीत दिसत आहेत. हा सुंदर लग्नाचा व्हिडीओ पलकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पलकने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तो माझ्याकडे पाहून हसेल, ही आशा मनात घेऊन मी इथे आले होते. पण तो रडला’, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं. दोघांचा हा व्हिडीओ पाहून चाहते आणि नेटकरीही भावुक झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव