आमिरने तीन लग्नं केली.. तुम्ही चार करा ना; वारिस पठाण यांचा भाजप नेत्यावर निशाणा – Marathi News | Aamir Khan Marriage : Nitesh Rane’s Love Jihad Claim and Waris Pathan’s Reply


आमिरच्या लग्नावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्याला वारस पठाण यांनी सुनावलं

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. आमिरने 5 जुलै रोजी, त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाह केला. आमिरचं हे तिसरं लग्न असून कुटुंबिय, मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत त्याच्या घरी हे लग्न पार पडलं. मात्र आमिरच्या या लग्नानंतर अनेक कमेंट्स येत असून त्याला थोडंफार ट्रोलही केलं जात आहे. याच मुद्यावरून काही राजकारण्यांनीही त्याला खडेबोल सुनावले. भारतीय जनता पक्षाचे नेते, नितेश राणे यांनी नुकतीच आमिर खानवर सडकून टीका केली. आमिर हा ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे, अशी बोची टीका नितेश राणेंनी केली असून त्याचे चित्रपट पाहू नका, असं आवाहन देखील त्यांनी हिंदू समुदायाला केलं यापूर्वी बजरंग दलानेही आमिरविरोधात आंदोलन केलं होतं, तसंच त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. आमिरच्या आधीच्या 2 पत्नी रीना दत्ता, किरण राव या हिंदू आहेत. तर त्याची तिसरी पत्नी गौरीह ही देखील हिंदू असून, त्याचवरून बरीच टीका होत आहे.

नितेश राणेंनी आमिरला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर असं संबोधल्यानंतर आता AIMIM च्या नेत्याने त्याना चोख प्रत्युत्त दिलं आहे. वारिस पठा यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलं. नितेश राणे यांना आमीर खानचा ‘हेवा’ वाटतो आणि म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत, असा दावा वारिस पठाण यांनी केला. “आमिर खानने तीनदा लग्न केले आहे… मग तुम्ही चारदा लग्न का करत नाही? तुम्हाला कोणी रोखले आहे? तुम्हाला हेवा का वाटतोय?” असा खोचक सवाल वारिस पठाण यांनी विचारला.

आमिरचे कुटुंबीय, मित्रांना आक्षेप नाही ना..

एवढंच नव्हे तर AIMIMचे नेते वारिस पठाण पुढे असं म्हणाले की, “आमिर खानच्या लग्नसमारंभाला त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांचा मुलगा, मुलगी, जावई तसेच मित्रमंडळी आणि अनेक नामांकित उद्योगपतीही उपस्थित होते. त्यापैकी कोणालाही कोणताही आक्षेप नव्हता. मात्र, आक्षेप केवळ तुम्हालाच आहे. नेमके तुम्हालाच याचा त्रास का होत आहे?” असा सवाल त्यांनी नितेश राणेंना केला.

‘नितेश राणेंना ‘जिहाद’चा अर्थही माहीत नाही’

“आमिर खान यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आणि आपल्या इच्छेनुसार तिसरे लग्न केले आहे. एखाद्या व्यक्तीला कायद्याने परवानगी असेल आणि त्याने स्वतःच्या इच्छेने विवाह केला, तर त्यात आक्षेप घेण्याचे कारण नाही, असं वारिस पठाण यांनी उपरोधिक शब्दांत नितेश राणेंवर टीका करताना म्हटलं. ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थही तुम्हाला माहीत नाही. केवळ राजकीय वक्तव्ये करण्यासाठी अशा प्रकारची बिनबुडाची विधाने केली जात आहेत. अशा वक्तव्यांचा कोणताही परिणाम होत नाही.” असं ते म्हणाले

“देशात आंतरजातीय विवाह होत नाहीत का? असा सवाल पठाण यांनी विचारला. तुमच्या मनात मुस्लिम समाजाविषयी असलेला द्वेष आणि पूर्वग्रह यामुळेच अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. तुमचे लक्ष्य आमिर खान नसून, मुस्लिम समाजाला लक्ष्य करणे हा त्यामागील उद्देश आहे”. “अशा प्रकारच्या वक्तव्यांना उत्तर देण्याचीही माझी इच्छा नाही. मुस्लिम समाजाविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करणे आणि बिनबुडाचे आरोप करणे ही काही जणांची सवय झाली आहे” अशा शब्दात पठाण यांनी नितेश राणेंना सुनावलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *