Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड… लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule


Team India Cricket Full Schedule : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB) रविवारी (31 मे) गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि तब्बल दोन महिने चाललेल्या आयपीएल 2026 च्या थराराचा समारोप झाला. पण क्रिकेटप्रेमींनो, शांत बसायला वेळ नाही. कारण अवघ्या एका आठवड्याच्या आत भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

6 ते 20 जून दरम्यान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 1 कसोटी आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. न्यू चंदीगड येथे होणारा हा कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) सायकलचा भाग नसेल. यानंतर ‘मेन इन ब्लू’ युरोप दौऱ्यासाठी उड्डाण करेल, जिथे संघ आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध 7 टी-20 आणि 3 वन-डे सामने खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून, ही मालिका WTC चा भाग असेल (या मालिकेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही). भारताचा 2026-27 चा घरचा हंगाम सप्टेंबरच्या शेवटी सुरू होईल. भारतीय संघ डिसेंबरपर्यंत आयर्लंड, इंग्लंड, जिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.

टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक (Team India All Schedule)

अफगाणिस्तानचा भारत दौरा (मायदेशात)

  • 06 – 10 जून: एकमेव कसोटी सामना (न्यू चंदीगड)
  • 13 जून: पहिला वन-डे सामना (धरमशाला)
  • 17 जून: दुसरा वन-डे सामना (लखनऊ)
  • 20 जून: तिसरा वन-डे सामना (चेन्नई)

भारताचा आयर्लंड दौरा

  • 26 जून : पहिला टी-20 सामना (बेलफास्ट)
  • 28 जून: दुसरा टी-20 सामना (बेलफास्ट)

भारताचा इंग्लंड दौरा  

  • 01 जुलै: पहिला टी-20 सामना (चेस्टर-ली-स्ट्रीट)
  • 04 जुलै: दुसरा टी-20 सामना (मँचेस्टर)
  • 07 जुलै: तिसरा टी-20 सामना (नॉटिंगहॅम)
  • 09 जुलै: चौथा टी-20 सामना (ब्रिस्टल)
  • 11 जुलै: पाचवा टी-20 सामना (साऊदॅम्पटन)
  • 14 जुलै: पहिला वन-डे सामना (बर्मिंगहॅम)
  • 16 जुलै: दुसरा वन-डे सामना (कार्डिफ)
  • 19 जुलै: तिसरा वन-डे सामना (लॉर्ड्स, लंडन)

भारताचा झिम्बाब्वे दौरा

  • 23 जुलै: पहिला टी-20 सामना (हरारे)
  • 25 जुलै: दुसरा टी-20 सामना (हरारे)
  • 26 जुलै: तिसरा टी-20 सामना (हरारे)

ऑगस्ट 2026

भारताचा श्रीलंका दौरा (2 कसोटी, 3 टी-20 सामने) – तारखा निश्चित नाहीत

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026

17 सप्टेंबर – 3ऑक्टोबर – आशियाई खेळ 2026, जपान (टी-20 स्वरूप)
27 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर – भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका (3 सामने)
6-17 ऑक्टोबर : भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिका (5 सामने)

ऑक्टोबर आणि डिसेंबर 2026

22 ऑक्टोबर – डिसेंबर: भारताचा न्यूझीलंड दौरा (2 कसोटी, 5 एकदिवसीय, 5 टी-20)

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : आठवडाभरानंतर पुन्हा वैभव सूर्यवंशीचा धमाका! आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार 15 वर्षीय युवा स्टार; जाणून घ्या संपूर्ण Schedule

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *