Trigrahi Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्यात ग्रहांच्या हालचालीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 15 जून रोजी सूर्य ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत आधीपासूनच बुध आणि चंद्र ग्रह स्थित आहेत. अशा प्रकारे तीन ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा शुभ ग्रहांचा संयोग 17 जूनपर्यंत असणार आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे. मात्र, काही राशींना या काळात शुभवार्ता मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीत हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा फार चांगला काळ असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळेल. घरातील वातावरण देखील आनंदी असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग फार महत्त्वाचा मानला जाणार आहे. नोकरीत पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला लवकरच मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. लवकरच यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींची चांदीच चांदी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!