Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले…


Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: आगामी विधानपरिषद निवडणुकीतील चंद्रपूर-गडचिरोलीवर्धा  या जागेवरुन भाजपने उद्योजक अरुण लखाणी यांना उमेदवारी देऊ केली आहे. अलीकडेच अरुण लखाणी यांचा मुलगा सारंग लखाणी आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revti Sule) यांचे लग्न ठरले होते. लखाणी-सुळे कुटुंबीयांचे ऋणानुबंध जुळल्यानंतर काही दिवसांतच भाजपने अरुण लखाणी (Arun Lakhani) यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सध्या शरद पवार गट हा विरोधी पक्षात आहे. भाजपच्या (BJP) उजव्या विचारसरणीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू-फुले-आंबेडकरी  या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष मानला जातो. त्यामुळे अनेकांनी अरुण लखाणी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर विचारसरणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, या सगळ्याबाबत बोलताना अरुण लखाणी यांनी राजकारणाबाबत एक मोलाचा सल्ला दिला. (Maharashtra Politics News)

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी नाव जाहीर केल्यानंतर मला सुप्रिया सुळे यांनी अभिनंदनासाठी मेसेज केल्याचे अरुण लखाणी यांनी सांगितले. होय, सुप्रिया सुळेंचा अभिनंदनाचा मेसेज आला होता, असे त्यांनी म्हटले.  पवार कुटुंबीय राजकारणातील मोठे प्रस्थ आणि आता ते आमचे नातेवाईक असल्याने ती चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगवेगळे असतात, असे मत अरुण लखाणी यांनी व्यक्त केले.

Vidhan Parishad Election 2026: कोण आहेत अरुण लखाणी?

लखाणी कुटुंब मूळचे विदर्भातील मलकापूर येथील आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब व्यवसाय निमित्ताने नागपुरात स्थायिक झाले होते.

* लखाणी यांनी “विश्वराज इन्फ्रा” या कंपनीच्या माध्यमातून रस्ते निर्मितीचेही काम केले आहे.

* नागपूर अमरावती रोडवरील तिवसा शहराच्या जवळ फोर लेन रस्त्याची बांधणी त्यांनी केली. त्याकाळी तो विदर्भातील पहिला फोर लेन रस्ता मानला गेला होता…

* त्याशिवाय चंद्रपूर-राजुरा रोडची निर्मिती ही त्यांच्याच विश्वराज इन्फ्रा कंपनीने केली आहे.

* लखाणी नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू असून देवेंद्र फडणवीस यांचीही निकटवर्तीय मानले जातात.

* नागपूर महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा कामाचे खाजगीकरण करताना फ्रान्सच्या ज्या “वेओलिया” कंपनीला काम मिळाले होते. त्यावेळी वेओलिया कंपनीसोबत भारतीय कंपनी म्हणून अरुण लखाणी यांच्या विश्वराज इन्फ्रा चे सामंजस्य करार होऊन “ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स” (ocw) ही संयुक्त कंपनी स्थापन झाली होती.

* गेले अनेक वर्ष हीच ocw कंपनी नागपूर महापालिका हद्दीत पाणी पुरवठ्याचे काम करते.

* मात्र कोविडच्या काळात अरुण लखाणी ओसीडब्ल्यू मधून बाहेर पडले असून आता ओसीडब्ल्यूची मालकी पूर्णपणे वेओलिया कंपनीकडे आहे.

* अरुण लखाणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून इंडियन बॅडमिंटन असोसिएशनमध्येही पदाधिकारी राहिले आहेत.

* तरुण भारत या वर्तमानपत्राचा व्यवस्थापन पाहणाऱ्या नरकेसरी प्रकाशनमध्येही ते प्रमुख पदावर होते.

* भाजप नेत्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने एकेकाळी अरुण लखाणी यांचं नाव आधी विधान परिषद सदस्य म्हणून नंतर राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, अद्याप अरुण लखाणी यांची वर्णी विधान परिषद किंवा राज्यसभेवर लागू शकली नव्हती. 

* अरुण लखाणी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत, अरुण लखाणी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा झालाय आणि लवकरच लग्न होणार आहे. 

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

आणखी वाचा

Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या….

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *