Surya Nakshatra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे (May 2026) महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar) एक महत्त्वाचं संक्रमण करणार आहे. 11 मे 2026 रोजी सूर्य देव चंद्राच्या प्रिय नक्षत्रात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, रोहिणी नक्षत्राला फार शुभ आणि वृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सूर्याचं या नक्षत्रात येणं फक्त आपल्या प्रकृतीत बदल आणत नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील लाभदायी ठरतं. त्यामुळे या काळात कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी रोहिणी नक्षत्र लाभदायी ठरमार आहे. या काळात सूर्याच्या संक्रमणाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच, तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील. पैशांची बरकत वाढेल. नवीन कल्पनांवर तुम्ही काम कराल. तुमची सेविंग्स वाढतील.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीचा स्वामी सूर्य ग्रह जेव्हा रोहिणी नक्षत्रात असतो. तेव्हा शुभ परिणाम मिळतो. या काळात करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ झालेली दिसेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. भविष्यासाठी तुम्ही काही योजना राबवाल. तसेच, तुमच्याकडून पैशांची बचत होईल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Vastu Tips : घरात वाईट काळ येण्याचे ‘हे’ आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार…
आणखी वाचा