Sonam Wangchuk: आंधळाही इतका आंधळा..; सोनम वांगचूक यांच्यावरून दिग्दर्शकाने सरकारला झाप झाप झापलं – Marathi News | Bollywood popular director make target on government on social media in the support of Sonam Wangchuk on


Sonam Wangchuk: सोमन वांनचूक यांचं उपोषण गेल्या 20 दिवसांपासून सुरु आहे. उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती देखील खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केली आहे. झीनत अमान यांच्यापासून सोनी राजदान, अभय देओल, पूजा बत्रा, शबाना आजमी आणि ओमी वैद्य यांच्या शिवाय रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह आणि स्वरा भास्कर यांनी देखील सोनम वांगचूक यांनी उपोषण थांबण्यासाठी विनंती केली आहे. आता दिग्दर्शक अनुराग कश्यप याने देखील यामध्ये उडी घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिग्दर्शकाने सरकारला झाप झाप झापलं आहे. शिवाय अंधळाही इतका अंधळा नसतो.. असं सांगितलं आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची सोशल मीडिया पोस्ट

सोनम वांगचूक यांचं समर्थन करत आणि सरकारवर टीका करत अनुराग कश्यप म्हणाला, ‘एक काळ असा देखील होता, जेव्हा उपोषणाचं काही महत्त्व होतं… लोकं असंच उपोषणासाठी बसत नाहीत. ही खरंच चिंतेची बाब आहे, जेव्हा सिस्टमला लोकांच्या जीवाची काहीच पर्वा नसते. फक्त अशीच लोक उपोषण करण्यासाठी बसतात, ज्यांना खरंच लोकांचं दुःख कळतं आणि ते न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात.’

सत्ताधाऱ्यांची शांतता हा एखाद्याचा जीव घेण्याच्या इराद्याचा पुरावा – अनुराग कश्यप

अनुराग कश्यप पुढे म्हणतात, मी सोनम वांगचूक यांच्याप्रणाणे उपोषणासाठी बसू शकत नाही. कारण माझं मन इतकं मोठं नाही, पण मी त्यांच्यासोबत कायम उभा असेल. सोनम वांगचूक जे करत आहे, ते करण्याची हिंमत माझ्यात नाही. परंतु सत्तेत असलेल्यांची शांतता इतकी खोल आहे की, तीच त्यांच्या गुन्ह्याचा आणि जीव घेण्याच्या त्यांच्या इराद्याचा पुरावा ठरते. मी सोनम वांगचूक यांच्यासारख्या धाडसी व्यक्तीच्या पाठीशी उभा आहे. बहिरेही इकते बहिरे नसतात आणि आंधळेही इतके आंधळे नसतात. प्राणी आणि राक्षसांचं मन देखील दगडासारखं नसतं… हे त्यांच्यापेक्षाही भयंकर नरभक्षक आहेत. गप्प राहताना देखील आता लाज वाटू लागली आहे….’ असं देखील अनुराग कश्यप म्हणाले.

सांगायचं झालं तर, नीट (NEET) परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या विरोधात तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक जंतरमंतरवर उपोषण करत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या 25 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. तरीही सरकारवर याचा काहीच परिणाम झालेला नाही, ज्यामुळे अनुराग कश्यप यांनी “आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,” अशी टिप्पणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *