Siya Goyal: केतनला जीव घेऊनही सियाचा माज उतरेना, मीडियाला पाहून केलं घाणेरडं कृत्य; सगळेच संतापले | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

आरोपी सिया गोयलनं तिच्या बेजबाबदार वागणुकीचं जगाला दर्शन घडवलं असून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींना सियाने अश्लिल हावभाव  दाखवून नवं कांड केलं.

Siya Goyal
Siya Goyal

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयलची मुजोरी सुरूच आहे. पुण्यात सियाने माध्यम प्रतिनिधींसमोर अश्लील हावभाव केले. त्यामुळे सिया गोयलच्या वर्तनाची चर्चा पुन्हा सुरू झालीय. आरोपी सिया गोयलनं तिच्या बेजबाबदार वागणुकीचं जगाला दर्शन घडवलं असून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींना सियाने अश्लिल हावभाव  दाखवून नवं कांड केलं.

सियो गोयलला घेऊन पोलीस गंगाधाम चौकातील तिच्या घरी दाखल झाले होते. सियाचे कपडे, मोबाईलसह पोलिसांनी इतर गोष्टींचा पंचनामा केला. सियाने कुठले पुरावे नष्ट केले का, याचा तपास पोलीस करताहेत. गंगाधाम चौकातल्या घरातील तपास झाल्यानंतर सियाला घेऊन पोलीस जात होते. केतन अग्रवाल हत्याकांडाकडे सर्व राज्याचं लक्ष असल्यानं माध्यम प्रतिनिधी वार्तांकन करत होते. मात्र कर्तव्यावर असलेल्या माध्यम प्रतिनिधींसमोर सियाने अश्लील वर्तन केलं.

आरोपीच्या जबाबांची पडताळणी करण्यासाठी चाचणी

निष्पाप केतन अग्रवाल याच्या हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसलाय. केतनच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस पुरावे गोळा करताहेत. आरोपी चेतन चौहान आणि सिया गोयलला पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी लोहगडावर नेऊन क्राईम सिन रिक्रियेट केला. केतन अग्रवालला दरीत ढकलण्यापूर्वी आरोपींनी या कृत्याचा सराव केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगाने सियाला कथित ‘रिहर्सल’ झालेल्या ठिकाणीही नेण्यात आलं. तसंच लाय-डिटेक्टर चाचणीसाठी पोलिसांनी कोर्टाची परवानगीही मागितली आहे. तपासातील विसंगती आणि आरोपीच्या जबाबांची पडताळणी करण्यासाठी चाचणी महत्त्वाची ठरू शकते, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.

कसा झाला  आरोपींचा पर्दाफाश? 

केतन अग्रवालचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला गेला. मात्र केतनच्या बहिणीला आलेला संशय, तपासात मिळालेले वेगवेगळे पुरावे, सिया आणि चेतनमधील जवळीक या सर्वांच्या आधारे हा पूर्वनियोजित कट असल्याच्या संशयाला बळकटी मिळत गेली. डिजिटल पुराव्यांनी तर हत्या प्रकरणातील आरोपींची पोलखोल केली. आरोपींचा पर्दाफाश झाला. मात्र असं असूनही सिया गोयलची मुजोरी आणि माज कमी झालेला नाही, हेच तिच्या अश्लील कृत्यावरून स्पष्ट होतंय.

हे ही वाचा :

मराठी बातम्या/पुणे/

Siya Goyal: केतनला जीव घेऊनही सियाचा माज उतरेना, मीडियाला पाहून केलं घाणेरडं कृत्य; सगळेच संतापले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *