सोशल मीडियावर मैत्री केली,नंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण, स्टार क्रिकेटर तुरुंगात जाणार, नेमकं प्रकरण काय? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

एका क्रिकेटरने एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री करून तिचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या आरोपांची क्रिकेटरने कबुली देखील दिली आहे, त्यामुळे त्याला आता तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.

Australian cricketer
Australian cricketer

Aaron Summers News : क्रिकेटर म्हटलं तर फेम आलंच पण या फेमसोबत क्रिकेटरसोबत अनेक घटना घडतात.काही क्रिकेटर फिक्सिंगमध्ये फसतात, तर काहींवर फसवणुकाचे आणि लैंगिक शोषणाचे आरोप होत असतात.अशीच एक घटना आता क्रिकेट जगतातून समोर आली आहे. या घटनेत एका क्रिकेटरने एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री करून तिचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या आरोपांची क्रिकेटरने कबुली देखील दिली आहे, त्यामुळे त्याला आता तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ॲरॉन समर्स आहे.ॲरॉन समर्सने अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपाखाली आपला गुन्हा कबूल केला आहे.आता त्याला दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. टास्मानियाचे सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये या प्रकरणावर अंतिम निकाल देईल.

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, हे प्रकरण 2018 सालचे आहे, जेव्हा तो होबार्ट हरिकेन्स संघाचा भाग होता. त्याच्यावर आरोप आहे की त्याने सोशल मीडियाद्वारे एका अल्पवयीन पीडितेशी संपर्क साधला आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. जूनच्या अखेरीस, समर्सने आपला जबाब बदलला आणि तीन गंभीर आरोपांमध्ये आपला गुन्हा कबूल केला.

क्रिकेटपटूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅरोलिन ग्रीव्हज यांनी न्यायालयाला सांगितले की, घटनेच्या वेळी त्यांचा पक्षकार एका अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतून जात होता. तो सामाजिकदृष्ट्या एकाकी पडला होता आणि आपला बहुतेक वेळ सोशल मीडियावर घालवत होता. वकील म्हणाल्या, “ही घटना त्याच्या मनातून कधीच जाणार नाही, पण त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे.”

कॅरोलिन ग्रीव्हज यांनी असेही सांगितले की, त्यावेळी ॲरॉन समर्सला ऑस्ट्रेलियन सर्किटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जात होते आणि त्याला भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जात होते. त्या पुढे म्हणाल्या, “ऑस्ट्रेलियामध्ये किंवा जगात इतरत्र कुठेही व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न आता कायमचे संपले आहे, हे त्याला माहीत आहे.”

दरम्यान ॲरॉन समर्सची ही पहिली गुन्हेगारी केस नाही.2021 मध्ये, अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे चित्रण करणारी सामग्री बाळगणे आणि शेअर करण्याच्या एका वेगळ्या प्रकरणात त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. त्या प्रकरणातही त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याचा अर्थ असा की, समर्सला यापूर्वीही बाल लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. कॅरोलिन ग्रीव्हज यांनी न्यायालयाला निलंबित शिक्षेचा विचार करण्याचे आवाहन केले होते, परंतु न्यायाधीश हेलन वूड यांनी स्पष्ट केले की या प्रकरणात अशी सवलत शक्य नाही. यानंतर, न्यायालयाने ॲरॉन समर्सचा जामीन रद्द केला आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.आता त्याला ऑगस्टमध्ये शिक्षा सुनावण्यात येईल.

कारकिर्द

30 वर्षीय ॲरॉन समर्सने बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये होबार्ट हरिकेन्सचे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये टास्मानियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे तो ऑस्ट्रेलियाच्या सर्वात प्रतिभावान वेगवान गोलंदाजांपैकी एक बनला होता. परंतु आता त्याची क्रिकेट कारकीर्द संपली आहे असे मानले जाते.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ॲरॉन समर्सने सात लिस्ट ए सामने आणि तीन टी20 सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यांमध्ये समर्सने 77.00 च्या सरासरीने पाच बळी घेतले आहेत, तर टी20 क्रिकेटमध्ये त्याला एकही बळी घेता आलेला नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

सोशल मीडियावर मैत्री केली,नंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण, स्टार क्रिकेटर तुरुंगात जाणार, नेमकं प्रकरण काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *