IND vs ENG : संजू सॅमसनची सलग 3 सामन्यांत निराशा, आता डच्चू मिळणार? – Marathi News | sanju samson flop 3 consecutive match vaibhav sooryavanshi may get chance on his place in playing 11 against england


वैभव सूर्यवंशी याची गेल्या 3 टी 20i सामन्यांपासून पदार्पणाची प्रतिक्षा कायम आहे. टीम इंडियात एकसेएक आणि तोडीसतोड खेळाडू आहेत. त्यामुळे वैभवला अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र वैभवच्या पदार्पणाची वेळ आली आहे का? असा प्रश्न टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याच्या सातत्यपूर्ण आणि निराशाजनक कामगिरीमुळे उपस्थित केला जात आहे. संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या 2 सामन्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे संजूला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातून बाहेर करुन वैभवला संधी देण्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजूची 3 सामन्यांमधील कामगिरी

संजू आयर्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेतील दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला. संजूने पहिल्या सामन्यात 5 धावा केल्या. तर संजूला दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. संजूने इंग्लंड विरुद्धही अशीच निराशा केली. संजू इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20i सामन्यात 1 धाव करुन बाद झाला.

संजूचा धावांसाठी संघर्ष

याच संजूने काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं होतं. संजूने 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. संजूला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज या पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. संजूने हाच तडाखा आयपीएल 2026 स्पर्धेतही कायम ठेवला. मात्र संजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गेल्या 3 सामन्यांत धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट संजूला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेणार की विश्वास कायम ठेवत आणखी एक संधी देणार? हे येत्या दिवसांतच स्पष्ट होईल.

संजूची देशाबाहेर निराशाजनक कामगिरी

दरम्यान संजूची देशाबाहेर सलग 10 डावांत काही खास कामगिरी राहिलेली नाही. संजूने भारताबाहेरील सलग 10 डावांत 2 शतकं झळकावली आहेत. मात्र संजू तब्बल 5 वेळा झिरोवर आऊट झाला आहे. तर संजूने 3 डावांत 2, 5 आणि 1 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूबाबत आता काय निर्णय होतो हे दुसऱ्या टी 20i सामन्यातील टॉसनंतर स्पष्ट होईल. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *