अहिल्यानगरमध्ये भरदिवसा गॅंगवॉर, तरुणावर जीवघेणा हल्ला, तर पुणे गोळीबार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात


Ahilyanagar Shrirampur Crime News :  अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा श्रीरामपूर शहरात भरवस्तीत गॅंगवॉरची घटना घडली आहे. मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, आणि गोळीबार झाल्याची माहीती मिळत आहे. या हल्ल्याच्या थरार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहरातील पूर्णवादनगर परिसरातील चौकात ही घटना घडली आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर उपचार सुरु

2 ते 3 दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चौकात थांबलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे. शुभम यादव (वय वर्ष 19 ) हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यासह फोरेन्सिक टिम घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्ल्याच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे पोलिसांच्या ताब्यात

जमिनीच्या वादातून मारामारी आणि गोळीबार केल्या प्रकरणी पुण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह एकाला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या सूस पाषाण रोडवर एका जमिनीचा ताबा घेण्यासाठी चांदेरे रात्री 1 च्या सुमारास गेले असता तेथील सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या वाद झाला आणि त्यानंतर चांदेरे आणि एका सुरक्षा मध्ये मारामारी झाल्यानंतर चांदेरे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल मधून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घटना कळताच पोलिसांनी चांदेरे यांच्याकडील पिस्तूल आणि स्वतः चांदेरे यांनी त्यांच्या साथीदाराला ताब्यात घेतलं  या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून बावधन पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे.  

हिंगोली बसस्थानकात मोफत तिकीट काढण्याच्या कारणावरून वाहकाला बेदम मारहाण

 

हिंगोली बसस्थानकात आज मोफत तिकीट काढण्याच्या कारणावरून प्रवाशाने साथीदारासह वाहकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घजली आहे . एसटी बसच्या वाहकावर काही प्रवाशांनी धारदार शस्त्र आणि पंचने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनं हिंगोली जिल्ह्याती एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून, हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बससेवा बंद ठेवत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *