Shubman Gill IPL 2026 : हार्दिक, संजू शर्यतीतून OUT… कसोटी, वनडेनंतर आता टी-20 संघाचा कर्णधार होणार प्रिन्स? दिग्गज फिदा


Mohammad Kaif On Shubman Gill IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. फलंदाज म्हणून 600 हून अधिक धावा ठोकतानाच त्याने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर गुजरातला प्लेऑफचे तिकीटही मिळवून दिले आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्सला तब्बल 89 धावांनी धूळ चारत त्यांचा प्रवास संपवला. गिलच्या या जबरदस्त कर्णधारपणावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ देखील फिदा झाला आहे.

गिलच या हंगामातील नंबर वन कॅप्टन – मोहम्मद कैफ

मोहम्मद कैफच्या मते, आयपीएल 2026 मध्ये शुभमन गिलने ज्या पद्धतीने दबाव हाताळला आहे, ते एका महान कर्णधाराचे लक्षण आहे. विशेषतः गोलंदाजांचा वापर करण्याची त्याची शैली जबरदस्त असल्याचे कैफने म्हटले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर गिलचे कौतुक करताना कैफने लिहिले, “माझ्यासाठी शुभमन गिल हा या आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. महान कर्णधाराची खरी ओळख म्हणजे तो आपल्या गोलंदाजांचा वापर कसा करतो. गुजरातच्या गोलंदाजांनी 14 सामन्यांत 108 विकेट्स घेतल्या आहेत.”

कैफने पुढे असेही सांगितले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि सीएसकेसारखे मजबूत संघ गुजरातच्या गोलंदाजांसमोर ऑलआउट झाले. गिल आपल्या गोलंदाजांना कसोटी क्रिकेटसारखी अचूक लाईन-लेंथ टाकण्याचा सल्ला देतो, हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचेही कैफने स्पष्ट केले.

पांड्या गेल्यानंतर गुजरात संघाची धुरा

कैफच्या मते, शुभमन गिलचे क्रिकेट पूर्णपणे किताबी आहे. त्याची फलंदाजीची तंत्रशुद्ध शैली आणि सामन्यातील परिस्थिती ओळखून गोलंदाजांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची कला अफलातून आहे. 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्स व्यवस्थापनाने गिलवर विश्वास दाखवत त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली होती. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच हंगामात किताब जिंकला होता, तर पुढच्या वर्षी उपविजेतेपद मिळवले होते. त्यामुळे गिलच्या खांद्यावर मोठा दबाव होता.

कर्णधार म्हणून पहिल्या हंगामात गुजरात आठव्या स्थानावर राहिली होती. मात्र त्यानंतर गिलने मागे वळून पाहिलेच नाही. मागील वर्षी संघाने तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफ गाठले आणि यंदा 18 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मजबूत पकड ठेवली आहे.

हे ही वाचा –

Pakistan Squad vs Aus ODI Series : बाबर आजम IN, मोहम्मद रिझवान OUT…; पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी ODI टीमची घोषणा, कर्णधार कोण?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *