Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना ‘पाकिस्तानी’ का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक


Abhijeet Dipke:सोशल मीडियात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजित दीपकेवर आता पाकिस्तानचा समर्थन असल्याचा आरोप ट्रोलर्सकडून केला जात आहे. मात्र, आता अभिजितने स्क्रीनशाॅट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. अभिजितने ट्विट करत 94.7 टक्के फाॅलोअर्स भारतीय असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे फाॅलोअर्स वाढताच त्याला ट्विटरवर पाकिस्तानातून पाठिंबा म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता त्याने स्क्रीनशाॅट शेअर करत त्यांना चपराक दिली आहे. 

धमकी देणाऱ्यांवर कारवाई करणार की नाही?

दुसरीकडे, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने सुद्धा अभिजितने ट्विट करत धमकी देणाऱ्यांवर कारवाई करणार की नाही? अशी विचारणा केली आहे. अभिजितने ट्टिटवर धमकी देणारे व्हिडिओ, मेसेज पोस्ट केले आहेत. दुसरीकडे, अभिजितला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आता काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कॉकरोच जनता पार्टीटे ट्टविटर बंद केल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. 

चुकीचा आणि हानिकारक निर्णय

दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. थरूर म्हणाले की, या नवीन ऑनलाइन चळवळीने ते खूप प्रभावित झाले आहेत आणि देशातील तरुण या चळवळीशी का जोडले जात आहेत हे त्यांना समजते. त्यांनी भारतातील CJP चे ‘X’ खाते बंद करणे हा एक “चुकीचा आणि हानिकारक निर्णय” असल्याचे म्हटले आहे.

तरुणांना व्यासपीठ दिले पाहिजे

थरूर यांनी ‘X’ वर लिहिले की, CJP ने केवळ पाच दिवसांत इन्स्टाग्रामवर 15 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. ते म्हणाले की, तरुणांमधील राग त्यांना समजतो, म्हणूनच लोक या चळवळीत सामील होत आहेत. ते म्हणाले की, खाती बंद करण्याऐवजी तरुणांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. थरूर यांच्या मते, लोकशाहीत निषेध, व्यंग, विनोद आणि रागाला स्थान असले पाहिजे.

विरोधी पक्षासाठी एक मोठी संधी 

इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात थरूर म्हणाले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे दर्शवते की लोक सरकारवर नाराज आहेत. ते म्हणाले की, यामुळे विरोधी पक्षांनाही हे समजले पाहिजे की जनतेमध्ये एक मोठी संधी उपलब्ध आहे. थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये पुनरुच्चार केला की, ही एक संधी आहे जी विरोधी पक्षांनी समजून घेतली पाहिजे आणि तिचा उपयोग करून घेतला पाहिजे.

तरुण बदलाचा आवाज बनू शकतात

थरूर म्हणाले की, हे आंदोलन किती काळ टिकेल हे त्यांना माहीत नाही, परंतु त्यांना आशा आहे की यात सामील असलेले तरुण आपली ऊर्जा मुख्य प्रवाहातील राजकारण किंवा मतदानाच्या माध्यमातून बदलाचा आवाज बनवण्यासाठी वापरतील. ते म्हणाले की, जर असे झाले, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल.

‘पार्टी’ची सुरुवात कशी झाली?

‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना 30 वर्षीय राजकीय संवाद रणनीतिकार अभिजीत दीपकेनं केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यावर याची सुरुवात झाली. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉकरोच ‘ आणि ‘परजीवी’ यांच्याशी केली , ज्यामुळे निषेध सुरू झाला.

पक्षात सामील होण्यासाठी ‘अनोखे नियम’

हा व्यंगात्मक राजकीय गट स्वतःला विनोदी पद्धतीने सादर करतो. पक्षाचे म्हणणे आहे की, त्यात सामील होण्यासाठी व्यक्ती ‘बेरोजगार, आळशी, नेहमी ऑनलाइन असणारी आणि व्यावसायिकपणे तक्रार करण्यात पटाईत’ असली पाहिजे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *