पंढरपूर : पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याचं नियोजन करणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 23 आणि 24 जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी हे दोन दिवस पंढरपूरला येऊ नये, असं आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.(Pandharpur Vitthal Rukmini temple)
Pandharpur Vitthal Rukmini temple: 22 ते 24 जून रोजी होणार विठ्ठल मूर्तीवर लेपन
झिजत असलेल्या विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी अखेर 22 ते 24 जून दरम्यान पुरातत्व विभागाकडून विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार असून 23 आणि 24 जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे देशभरातील भाविक वारकरी आणि पर्यटकांनी 23 व 24 जून रोजी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. विठ्ठल मूर्तीची सातत्याने होत असलेल्या झीड प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती वारकरी सांप्रदाय आणि पुरातत्व विभाग यांची बैठक झाली होती. या बैठकीत देवाच्या मूर्तीला पारंपारिक पद्धतीने लेपन करायचे की रासायनिक पद्धतीने यावरून बराच घामासान झालं होता. (Pandharpur Vitthal Rukmini temple)
अखेर 22 जून ते 24 जून दरम्यान रासायनिक पद्धतीनेच हे लेपन होणार असून पुरातत्व विभाग नियमानुसार विठ्ठल मूर्तीवर लेपन करणार आहे. त्यामुळे 23 आणि 24 जून रोजी विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठल मूर्तीच्या पायाला एक खड्डा पडला असून इतर ठिकाणीही मूर्तीवर मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे समोर आल्यानंतर आता याच पद्धतीच्या दगडाची पावडर ऑरगॅनिक रसायनात मिसळून देवाच्या झिजलेल्या भागावर लावली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार दिनांक २२ ते २४ जून दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Pandharpur Vitthal Rukmini temple)
या लेपन प्रक्रियेमुळे दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्र तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे यासाठी दिनांक २३ व २४ जून या दोन दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे लेपन करून संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तीच्या काही भागांमध्ये नैसर्गिक झीज दिसून येत आहे. त्यानुषंगाने मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे व झिजलेल्या भागांची दुरुस्ती तसेच मूर्तीचे आयुष्यमान वाढविण्यासाठी संरक्षक आवरण (Protective Coating) देण्यात येणार आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!