Shani Gochar 2026 : सावधान…सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, ‘हा’ उपाय ठरेल फायदेशीर


Shani Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) न्यायदेवता तसेच, कर्मफळदाता म्हटलं जातं. शनिचं संक्रमण कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर फार गंभीर प्रभाव निर्माण करतं. येत्या 20 ऑगस्ट 2026 रोजी शनि एका महत्त्वाच्या अवस्थेत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हे संक्रमण फार आव्हानात्मक असणार आहे. 

शनिच्या संक्रमणाचा ‘या’ राशींवर होणार परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिचं हे संक्रमण मेष, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार कठीण असणार आहे. या राशीच्या लोकांना शनिच्या संक्रमणाच्या वेळी आपल्या करिअर, आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

मेष रास (Aries Horoscope)

शनिच्या प्रभावाने तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव जाणवेल. या काळात सहकाऱ्यांबरोबर तुमचे वाद होतील. करिअरमध्ये अनेक अडथळे येतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी शनिच्या संक्रमणाच्या वेळी आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये. या काळात सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबात तुमच्या मतभेद होऊ शकतात. तसेच, कुटुंबात अनेक मतभेदही होऊ शकतात. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात आपल्या कामाच्या ठिकाणी विलंब करता कामा नये. तुम्हाला आर्थिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमची अनेक कामे रखडू शकतात. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करु नका. 

उपाय 

तुम्हाला जर शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर त्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. 

हनुमान चालीसाचं पठण करा – प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसाचं पठण करा. यामुळे शनिचे अशुभ प्रभाव कमी होतील. 

शनिच्या मंत्राचा जप करा – दररोज 108 वेळा शनिच्या मंत्राचा जप करा. 

दान-पुण्य करा – शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल, काळे तीळ आणि उडीदाच्या डाळीचं दान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                         

Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित ‘ही’ 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *