पनवेल: पनवेलमधील एका नामांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या हॉटेलमधील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून (Panvel Crime News) कारवाई केली. या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.(Panvel Crime News)
Panvel Crime News : बनावट ग्राहकाच्या मदतीने रचला सापळा
हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे अनैतिक देहव्यापार चालत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार, पोलिसांनी सर्वप्रथम एका ‘बनावट ग्राहकाला’ (डिकॉय कस्टमर) हॉटेलमध्ये पाठवले. तिथे व्यवहार निश्चित झाल्याचा इशारा मिळताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने ‘हॉटेल राहुल पार्क फॅमिली रेस्टॉरंट गार्डन बार अँड लॉजिंग-बोर्डिंग’वर तातडीने छापा टाकला.(Panvel Crime News)
Panvel Crime News : कॅशिअरसह तिघांना अटक, हॉटेल मालक फरार
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी लॉजचा मॅनेजर गामा नंदू सोनकर, कॅशिअर दीपू उमेश यादव आणि वेटर प्रियांशु रविदास यादव या तिघांना घटनास्थळावरून अटक केली. मात्र, पोलिसांची धाड पडल्याचे समजताच या लॉजचा मालक रमेश शर्मा हा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.
या प्रकरणातील मुख्य संशयितांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) व इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने अटक केलेल्या तिन्ही आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे का आणि सुटका केलेल्या बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे भारतात कशा आल्या, या सर्व बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Crime News :देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ
काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai News) सुसंस्कृत अशा गिरगाव (Girgaon News) परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापार रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली होती. या कारवाईत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री (Marathi Actress) आहे. तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Movie) छोट्या तसेच कॅमिओ भूमिकांमधून झळकली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका दलालाला रंगेहाथ अटक केली असून, तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण कारवाईची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.