Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या युतीमुळे तयार होणार योग अत्यंत खास असतात. अनेकदा हे योग शुभ किंवा अशुभ परिणाम करतात. दोन दिवसांनी तयार होणाऱ्या योगाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल.
Gajkesari Yog 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या नक्षत्रातील आणि राशींमधील बदलांना विशेष महत्त्व आहे. 14 जुलैला एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग निर्माण होणार आहे, ज्याला ‘गजकेसरी योग’ म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात या योगाला सुख, समृद्धी, संपत्ती आणि यशाचे सर्वात मोठे कारक मानले जाते. हा शुभ योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा कुंडलीत किंवा गोचरामध्ये गुरू आणि चंद्राची युती होते. यंदा हा योग कर्क राशीमध्ये तयार होत आहे. कर्क राशीमध्ये चंद्राचा प्रवेश 14 जुलैला होणार असून तो 16 जुलैच्या संध्याकाळी 07:52 वाजेपर्यंत याच राशीत विराजमान राहील. जवळपास दोन दिवस या योगाचा प्रचंड शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात 4 राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकणार असून त्यांना प्रत्येक कामात यश आणि प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी योग चौथ्या भावात तयार होत आहे, जो आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरेल. या दोन दिवसांच्या कालावधीत तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते परत मिळतील. घर, जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची चिन्हे आहेत.
हा गजकेसरी योग थेट तुमच्याच राशीत म्हणजेच लग्न भावात तयार होत आहे. कर्क ही चंद्राची स्वतःची रास आहे आणि तिथे गुरू आधीपासूनच उच्च स्थितीत आहे, त्यामुळे तुमच्यासाठी हा राजयोगासारखा काळ असेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान झपाट्याने वाढेल. तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनेल आणि तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. व्यापारी वर्गाला नवीन मोठ्या डील्स मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात बँक बॅलन्स वाढवणारे ठरतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरू आणि चंद्राची ही युती मानसिक शांतता आणि जुन्या समस्यांमधून सुटका करणारी ठरेल. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी कामात किंवा कोर्ट-कचेरीच्या बाबींमध्ये अडकलेली कामे या दोन दिवसांत अचानक मार्गी लागतील. जुने कर्ज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने तुमची आर्थिक चिंता दूर होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि नवीन नोकरीच्या चांगल्या ऑफर देखील येऊ शकतात.
धनु राशीचा स्वामी स्वतः गुरू ग्रह आहे, त्यामुळे गुरू-चंद्राचा हा गजकेसरी योग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. नशिबाची 100% साथ मिळाल्यामुळे अत्यंत कमी कष्टांत तुम्हाला मोठे यश पाहायला मिळेल. अनपेक्षित मार्गाने अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात किंवा परदेशात जाऊन शिक्षण-नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांचे मार्ग मोकळे होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Mumbai,Maharashtra
जे हवं तेच घडणार! 48 तासांनंतर ‘या’ राशींच नशीब पालटणार, करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा; मिळणार बक्कळ पैसा
