Novak Djokovic: 39 वर्षीय टेनिस दिग्गज नोव्हाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत15 वर्षांनी लहान असलेल्या 24 वर्षीय जॅनिक सिनरकडून सरळ सेट्समध्ये पराभूत झाला. सर्बियन जोकोविचने शेवटचे ग्रँड स्लॅम विजेतेपद तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये जिंकले होते, जेव्हा तो यूएस ओपन चॅम्पियन होता. लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबमध्ये इटलीच्या सिनरने जोकोविचचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. सलग दुसऱ्या वर्षी तो अंतिम फेरीत पोहोचला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिनरने गेल्या वर्षी स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा पराभव केला होता. यावेळी, रविवारी सिनरचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल.
जोकोविचला एकही सेट जिंकता आला नाही
सिनरने उपांत्य फेरीत आक्रमक खेळ करत, 2 तास 20 मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचचा सलग तीन सेट्समध्ये पराभव केला. या विजयामुळे सिनरने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत झालेल्या पाच-सेटच्या पराभवाचा बदला घेतला. जोकोविचने 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. तो आपल्या 25व्या विजेतेपदाच्या शोधात होता, पण त्याला अपयश आले. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझकडून त्याचा पराभव झाला होता. फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत तो स्पर्धेतून बाहेर पडला होता.
जर्मनीचा झ्वेरेव्ह पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला
पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीत, जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने ब्रिटिश वाईल्डकार्ड आर्थर फर्डीचा 7-6, 6-2, 6-4 असा पराभव केला. झ्वेरेव्ह पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 29 वर्षीय झ्वेरेव्ह हा 1995 नंतर विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला जर्मन खेळाडू ठरला आहे. फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो ओपन युगातील तिसरा खेळाडूही ठरला आहे. संपूर्ण स्पर्धेत तो फक्त दोन सेट हरला आहे.
सचिन, गिल आणि लारा यांनी सामना पाहिला
दरम्यान, सेंटर कोर्टवरील रॉयल बॉक्समध्ये भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर, कसोटी कर्णधार शुभमन गिल, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि फुटबॉलपटू व्हर्जिल व्हॅन डाइक यांच्यासह अनेक क्रीडा तारे उपस्थित होते. विम्बल्डनने सचिनचे ‘क्रिकेटचा राजा’ असे संबोधून स्वागत केले.
इतर महत्वाच्या बातम्या