Sara Tendulkar : लाखात एक नणंद! साराच्या पोस्टमध्ये युजरने सानिया वहिनीला वगळल्याने तिचा एकच शब्दात कडक रिप्लाय, लाईक्सचा पडला पाऊस


Sara Tendulkar on Arjun Tendulkar : आयपीएल २०२६ मध्ये लखनौ आणि पंजाबमधील सामना पंजाबने जिंकला. मात्र सचिनचा मुलगा अर्जुनचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच साराने एक पोस्ट केलेली त्यामध्ये युजरने केलेली कमेंट तिला खटकली तिने लगेच रिप्लाय केला. अर्जुनच्या पत्नीसंदर्भात होती. नेमकी काय जाणून घ्या.

Sara Tendulkar Sania Chandok
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कर्णधार श्रेयस अय्यरचे तडाखेबंद शतक आणि प्रभसिमरनसिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने शनिवारी आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघावर सात विकेटनी मात केली. सलग सहा पराभवानंतर मिळवलेल्या या विजयामुळे ‘पंजाब’ने ‘प्ले-ऑफ’च्या आशाही कायम ठेवल्या आहेत. या सामन्यामध्ये माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला खेळण्याची संधी मिळाली होती. अर्जुननेही मिळालेल्या संधीचा फायदा करत आपली वेगळी छाप उमटवली. ४ ओव्हरमध्ये ३६ धावा देत एक विकेट घेतली. या प्रदर्शनानंतर अर्जुनचे कौतुक होत असून सचिन तेंडुलकर आणि बहीण सारानेही कौतुक केले आहे. साराने पोस्ट केलेली त्यामध्ये एका युजरने केलेल्या कमेंटमध्ये घरातील सर्वांना मेन्शन केले पण अर्जुनच्या पत्नीला नाही. साराने कमेंट पाहिल्यावर त्यावर रिप्लाय केला. नेमकं काय झालं जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

सारा तेंडुलकर हिने अर्जुनचे कौतुक करताना पोस्ट केली होती. त्या कमेंटवर चाहत्यांनी कमेंट केल्या. यामध्ये mukherjeedib7 या युजरने अभिमान बहिण, वडील आणि आई असं म्हणते इमोजी पोस्ट केले. म्हणजे सारा, सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. साराने कमेंट पाहिल्यावर त्याला रिप्लाय करत आणि बायको? असे विचारले. त्यावर एक दुसऱ्या युजरने हो हो हो बायकोपण असं म्हटले. त्यानंतर ज्याने ही कमेंट केलेली त्याला साराने रिप्लाय केल्यामुळे आनंद झाला. मला स्वर्गात गेल्यासारखं वाटत असल्याचं तो म्हणाला. साराने केलेल्या कमेंटला आतापर्यंत जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले होते.

Sara  Tendulkar Instagram

सामन्याचा धावता आढावा

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना ‘लखनौ ‘ने ‘पंजाब’समोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर देताना सलामीवीर प्रियांश आर्य खाते न उघडता, तर कॉनली अठरा धावांची भर घालून परतला. त्यामुळे ‘पंजाब’ची २ बाद २२ अशी स्थिती झाली होती. त्यानेकप प्रभसिमरन आणि श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ चेंडूंत १४० धावांची भागीदारी रचली. त्या जोरावर ‘पंजाब’ने सहज विजय मिळवला. ‘पंजाब’च्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्ले-ऑफच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
Maharashtra TimesLSG vs PBKS : शेवटी बापाचं काळीज! पोराने मैदान गाजवल्यावर सचिन तेंडुलकरची खास पोस्ट व्हायरल, शेवटी एक असा सल्ला जो सगळ्यांसाठीच महत्त्वाचा
‘लखनौ’ ची सुरुवात खराब झाली होती. अर्शिन कुलकर्णी आणि निकोलस पूरन झटपट परतले होते. इंग्लिसला जम बसण्यास वेळ लागला. त्याने आणि बदोनीने डावास स्थैर्य दिले. त्यानंतर इंग्लिस आणि पंतने धावगतीस वेग दिला. त्यामुळे ‘लखनौ’ने १५ षटकांत १४७ धावा केल्या होत्या. इंग्लिस परतल्यावर त्यांची धावगती कमी होत गेली. अब्दुल समदने प्रतिकार केला; मात्र ते दोनशेपासून दूरच राहिले

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा