India A vs Sri Lanka A 4th Match Tri Nation A Series : तिंरगा मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत ‘अ’ संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यजमान श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य ठरवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 31 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 141 धावा केल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे करार घेऊन आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे भारताचे नामांकित स्टार्स या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
आयपीएलचे कोट्यधीश स्टार्स ठरले ‘फ्लॉप शो’
या सामन्यात भारतीय संघात आयपीएलमधील एकापेक्षा एक सरस आणि महागडे खेळाडू खेळत आहेत, मात्र श्रीलंकेच्या फिरकी आणि अचूक गोलंदाजीसमोर या स्टार्सची पुरती दैना उडाली. प्रभसिमरन सिंग अवघ्या 11 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने कोट्यवधी रुपये मोजून संघात घेतलेला युवा खळबळजनक फलंदाज वैभव सूर्यवंशी 21 धावांवर बाद झाला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावा केल्या, पण मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले.
तर, मुंबई इंडियन्सचा भरवशाचा फलंदाज आणि या संघाचा कर्णधार तिलक वर्मा (23 धावा, 32 चेंडू) खेळपट्टीवर स्थिरावला होता. मात्र, त्यालाही मोठी खेळी करता आली नाही आणि कुगाथास मथुलनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. तसेच स्टार फिनिशर आयुष बदोनी याने 35 चेंडू खेळून अवघ्या 15 धावा केल्या. त्याच्या या संथ फलंदाजीमुळे संघावरचा दबाव वाढला. तर निशांत सिंधू फक्त 6 धावा करून बाद झाला.
गायकवाडचा एकाकी लढा, फिरकीची जादू
ऋतुराज गायकवाडने एक टोक सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने 42 चेंडूंत 3 चौकारांसह 37 धावांची संयमी खेळी केली, पण विजयकांत वियास्कंतने त्याला पायचीत करून भारताची सर्वात मोठी आशा संपुष्टात आणली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना हात उघडण्याची एकही संधी दिली नाही. विशेषतः विजयकांत वियास्कंत याने 6 षटकांत अवघ्या 9 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट 1.50 इतका राहिला.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला