‘धमाल’ चित्रपटातील हा लहान मुलगा 19 वर्षानंतर कसा दिसतो? व्हिडीओ पाहून व्हाल चकित – Marathi News | How does the boy who appeared alongside Sanjay Dutt in the movie Dhamaal look 19 years later


Dhamaal 4 : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या ‘धमाल’चा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘धमाल 4’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील विनोदी प्रसंग, कलाकारांची दमदार उपस्थिती आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे काही क्षण यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मात्र या ट्रेलरमुळे आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धमाल’ चित्रपटात अभिनेता संजय दत्त याच्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी करणारा लहान मुलगा अनेकांना आजही आठवतो. जवळपास 19 वर्षांनंतर त्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाल्याने चाहते आनंदित झाले आहेत.

ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात वेधून घेतले सर्वांचे लक्ष

‘धमाल 4’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात या बालकलाकाराशी संबंधित आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ट्रेलरमध्ये दिसलेल्या एका छोट्याशा झलकमुळे अनेक प्रेक्षकांना मूळ ‘धमाल’मधील तो गोंडस मुलगा आठवला. सोशल मीडियावरही या सीनची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यावेळी ‘धमाल’मध्ये 10 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या मुलाची भूमिका साहिल चौहान याने साकारली होती. चित्रपटात तो लोकप्रिय गायक व संगीतकार हिमेश रेशमियाचा चाहता दाखवण्यात आला होता. त्याची निरागस अभिनयशैली आणि विनोदी संवादांमुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

नव्या भागात नव्या बालकलाकाराची एंट्री

‘धमाल 4’मध्ये मात्र बालकलाकार म्हणून रियांश दाभीची निवड करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहून अनेकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. चित्रपटाच्या विनोदी वातावरणात त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

आता ‘धमाल 4’ 10 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जुन्या कलाकारांची धमाल, नव्या पात्रांची भर आणि विनोदाचा तडका यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा यशाची नवी नोंद करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *