Last Updated:
Sanchita Ugale Last Post : अभिनेत्री संचिता उगलेच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिची शेवटची पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर विश्वासच बसत नाही आहे.
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूने मनोरंजन विश्वास एकच खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील राहत्या घरात तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे. दरम्यान मृत्यूआधी संचिताने शेवटची पोस्ट केली होती.
संचिताची इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट काही तासांपूर्वीचच आहे. ‘मैं नाचू तू नचा’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत ती हातात कॅमेरा घेऊन दिसते. मागे डफली वाले डफली बजा, असे गाण्याचे बोल ऐकू येतात. हे गाणं स्वत: गात हातातील कॅमेऱ्याकडे पाहत ती एक्स्प्रेशन देत असते.
संचिताचा हा मृत्यूच्या काही तास आधीचा व्हिडीओ आहे. ज्यात ती खूप आनंदी दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिने स्वत: तिचं आयुष्य संपवलं यावर विश्वासच बसत नाही आहे. किंबहुना इतकी आनंदी असताना तिने आयुष्य का संपवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
संचिता उगले हिने शनिवारी 14 जून रोजी संध्याकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. यावेळी तिने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
अभिनेत्रीचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आचोळे पोलिसांनी रविवारी 15 जून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे.
Mumbai,Maharashtra
Sanchita Ugale : संचिता उगलेची काही तासांपूर्वीचीच पोस्ट! पाहून विश्वास बसणार नाही तिने आयुष्य संपवलं
