Ranveer Singh visit Chamundeshwari Temple: बंदी घातल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला, ‘कांतारा’नक्कल प्रकरणात माफीही मागितली


Ranveer singh visit at chamundeshwari temple :बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यानं गेल्या वर्षी कांतारा सिनेमातील एका दैवी पात्राची नक्कील केल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता हा वाद संपुष्टात आला आहे.

Ranveer Singh visit Chamundeshwari Temple
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गंभीर वादात अडकला असताना त्यानं आज मंगळवारी २६ मे २०२६ रोजी सकाळी कर्नाटकातील मैसूर इथल्या प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि पूजा केली.

‘कांतारा’ चित्रपटातील वादावर पडदा

गाजलेल्या ‘कांतारा‘ चित्रपटातील ‘दैवा’ परंपरेची नक्कल केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी रणवीरनं हे दर्शन घेतलं. या प्रकरणावर पडदा पडला असला तरी, आता ‘डॉन ३’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’नं (FWICE) त्याच्यावर बंदी घातल्याच्या काही तासांतच रणवीरनं चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यानं आता चर्चा सुरू आहे.
Maharashtra TimesTharala Tar Mag : सचिनच्या पापांची शिक्षा अस्मिताला, श्रीमंत असूनही पैशांची चणचण; पुर्णा आजीची प्रियाचा फोटो पाहताच भयंकर प्रतिक्रिया

नेमका काय आहे ‘कांतारा’ वाद?
तर झालं असं होतं की, गेल्या वर्षी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा: चॅप्टर १’ चं कौतुक करताना रणवीर सिंहनं व्यासपीठावर ‘चावुंडी दैवा’ या पवित्र धार्मिक परंपरेची नक्कल केली होती. तसंच बोलताना अनवधानानं त्यानं ‘भूत’ (Female Ghost) असं संबोधलं होतं. यामुळं कर्नाटकातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत रणवीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maharashtra Times‘डॉन ३’ सोडणं रणवीर सिंगला पडलं महागात, FWICE ची अभिनेत्यावर बंदी, आता चित्रपटांमध्ये काम करता येणार की नाही?
या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयानं अभिनेत्याला खडे बोल सुनावले होते. “सुपरस्टार असलात तरी वक्तव्यांचं भान राखलं पाहिजे,” असं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतर रणवीरच्या वकिलांनी न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला होता. न्यायालयानं गुन्हा रद्द करताना रणवीरला चार आठवड्यांच्या आत मैसूरच्या चामुंडी हिल्सवर जाऊन देवीची माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रणवीरनं आज मंदिरात जात दर्शन घेतलं आहे.

सर्वसामान्य भाविकाप्रमाणे गुपचूप दर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह मंगळवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास अगदी साध्या वेषात मंदिरात पोहोचला.त्यानं पांढरा कुर्ता-पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान केलं होतं.
ओळख पटू नये म्हणून त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. रांगेत उभे राहून त्यानं साधारण १० मिनिटे गर्भगृहात प्रार्थना केली.नंतर मंदिर प्रशासनानं त्याला ओळखलं आणि हार घालून त्याचे स्वागत केलं.

दुसरीकडे FWICE कडून बंदीची कारवाई
रणवीर सिंहचा हा मंदिर दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा तो बॉलिवूडमध्ये एका मोठ्या वादाचा सामना करत आहे. ‘डॉन ३’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी रणवीरनं या प्रोजेक्टमधून माघार घेतली. यामुळं निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचं मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा