Last Updated:
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री शबाना आझमी तर आंदोलन स्थळीही पोहोचल्या होत्या. त्या आंदोलनात सक्रिय होत्या. या सर्व घडामोडीत आजा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Salman Khan on Delhi Protest : नीट पेपर फुटीप्रकरणी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेत अभिनेते-अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री शबाना आझमी तर आंदोलन स्थळीही पोहोचल्या होत्या. त्या आंदोलनात सक्रिय होत्या. या सर्व घडामोडीत आजा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने एक्सवर पोस्ट शेअर करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. हे आंदोलन इतके शांततापूर्ण मार्गाने सुरू होते, परंतु त्याला हिंसक वळण लागले हे पाहून खूप वाईट वाटले. ज्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे यात नुकसान झाले किंवा जे दुखावले गेले, त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती आहे, असे सुरुवातीला सलमान खान म्हणाला.
पेपर लीक ही अत्यंत गंभीर समस्या आहे आणि आपल्या देशातील मुले एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत व त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून आनंद वाटतो.त्यांनी जी भूमिका घेतली आहे, मी त्याचे मनापासून कौतुक करतो.ही भूमिका त्यांचा अभ्यास करण्याची, स्वतःचे भविष्य घडवण्याची आणि एक महान, सुशिक्षित भारत निर्माण करण्याची त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा व तळमळ दर्शवते,असे सलमान खानने सांगितले.
हे आंदोलन,हा विरोध हा या समस्येवर मार्ग काढण्याचा योग्य मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांनी तो अत्यंत शांततापूर्ण मार्गाने केला आहे.ते खूप धाडसी आणि धीर गंभीर आहेत.शिक्षणासाठी प्रेरित असलेली ही नवी पिढी नक्कीच भारताचे नाव उज्ज्वल करेल,असे सलमान म्हणाला.
It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better…
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 22, 2026
हा मुद्दा केवळ विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील आहे, त्याचे राजकीय भांडवल केले जाऊ नये.याचे पूर्ण श्रेय केवळ आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळाले पाहिजे.मला पूर्ण विश्वास आहे की सरकारही त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करेल.यामध्ये सर्वांचाच फायदा आहे.यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आणि प्रार्थना आहे, असे देखील सलमान म्हणाला.
शिक्षण हा पुढचा ‘ट्रेड’ आणि ‘फॅशन’ बनला पाहिजे आणि वर्षागणिक ते अधिक ट्रेंडी व लोकप्रिय झाले पाहिजे; इतके की परदेशातूनही लोक भारतात शिकायला आले पाहिजेत आणि भारत हे जगातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र (Educational Hub) बनले पाहिजे,असेही सलमान म्हणाला आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 23, 2026 12:00 AM IST
Salman Khan : विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्यच, माझा पाठिंबा, पण…बॉलिवूडच्या ‘भाईजान’ची विद्यार्थ्यांसाठी खास पोस्ट
