Last Updated:
खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल नदीत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कंटेरन पुराच्या पाण्यात वाहुन गेला होता. तसेच या कंटेनरच्या चालक वाहकाचा अद्याप शोध लागलेला नाही आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल नदीत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कंटेरन पुराच्या पाण्यात वाहुन गेला होता. तसेच या कंटेनरच्या चालक वाहकाचा अद्याप शोध लागलेला नाही आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.असे असतानाच आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले नाही आहे. हा फुटेज पाहून अंगावर काटा येतो आहे.
खरं तर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने हा कंटेनर जगबुडी नदीच्या पुलावरील कठडा तोडत थेट सुमारे शंभर फूट खोल नदीत कोसळला. खर हा पुल येणाऱ्या वाहनांसाठी वेगळा आणि जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळा होता.वेगळा यासाठी कारण दोन्ही पुलाच्या मध्ये काहीसे अंतर होते. या अंतरामधूनच बरोबर हा कंटेनर 100 फुट खोल दरीत कोसळला होता. तुम्ही जर अंतर पाहिले तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.इतकं कमी हे अंतर होते.
दरम्यान कंटेनर नंदीत कोसळल्यानंतर मोठा प्रवाह असल्याने कंटेनर काही अंतर वाहून गेला. कंटेनरमधील मालही नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे.ही दुर्घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
100 फूट खोल नदीत कंटेनर कोसळल्याचा CCTV समोर, चालक-वाहकांच काय झालं? pic.twitter.com/zCbSYNEbDb
— News18 Marathi (@News18_marathi) July 22, 2026
या अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र चालक आणि वाहक यांचा अद्याप कोणताही संपर्क झालेला नसून त्यांचा नदीपात्रात शोध सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. चालक आणि वाहकाचा शोध लागल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण आणि पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.
Ratnagiri,Maharashtra
Jul 22, 2026 11:26 PM IST
