Dilip Walse Patil : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. यानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आजच्या दिवशी माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसेच आमदार दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही हा दिवस साजरा करायचो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच असावा, अजितदादांवर काळाने घाला घातला. आज अजितदादा आपल्यात राहिले नाहीत असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

अजितदादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न आपण करु

अजितदादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न आपण करु असे वळसे पाटील म्हणाले. दादा राजकारणी जरी असले तरी रसिकांच्यामध्ये बसून ते गाण्यांच्या आशा फर्माईशी करायचे की कुणाला कळायचं नाही की या माणसाला गाण्यातलेही कळायचं. अजित दादांच्या हातातून खूप मोठं काम महाराष्ट्रात व्हायचं होतं परंतु ती संधी एकदा आली ती गेली. एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आयुष्यात एकदा पंतप्रधान बनण्याची संधी आली होती ती गेली. एकदा पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पंतप्रधान बनण्याची संधी आली होती ती गेली. आणि अजितदादांच्या सुद्धा आयुष्यात मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती परंतु ती संधी गेल्याचे वळसे पाटील म्हणाले. आता जे गेलं त्याच्याबद्दल खेद नाही खंत नाही आपल्या नशिबात असेल तेच होईल असं दादा नेहमी सांगायचे असे वळसे पाटील म्हणाले.

पवार साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन अजितदादा पुढे मार्गक्रमण करत राहिले

अजितदादांच्या बद्दल सांगायचं झालं तर बारामतीतील काटेवाडी मध्ये जन्माला आलेल्या व्यक्तिमत्व. पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, पवार कुटुंबीयांबद्दल सांगायचं झालं तर पवार साहेबांच्या मातोश्री ज्यावेळेस रिझोल्युशन नव्हतं पुणे जिल्हा लोकल बोर्डामध्ये सदस्य म्हणून काम करत होत्या जिल्हा परिषदेची स्थापना होण्याच्या आधी एकंदरीत हे मूळ घराणं शेतकरी कामगार पक्षाचं राजकीय घराणं. या शेतकरी कामगार पक्षाची धुरा पुढे घेऊन जाताना सत्यशोधक समाजाचा जो विचार आहे, शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून सर्व जाती धर्म सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम या पवार कुटुंबाने केलेलं आहे. अतिशय सुशिक्षित आणि विचारपूर्वक समाजाला दिशा देण्याचे काम या कुटुंबाने केल्याचे वळसे पाटील म्हणाले. या कुटुंबातून अजितदादा आले तरुण वयात त्यांनी कामाला सुरुवात केली. पवार साहेबांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. पवार साहेबांचा संपर्क हा सगळ्याच पक्षांची होता. राजकीय भिन्नता असली तरी मनामध्ये कधीही कटूता त्यांची नव्हती. त्याच पवार साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन अजितदादा पुढे मार्गक्रमण करत राहिल्याचे वळसे पाटील म्हणाले.

अजितदादांकडे आलेलं काम होण्यासारखे असेल तर लगेच करायचे

मी आठ वेळा सलग विधानसभेत निवडून आलोय, मोठी संधी मला दिली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्ही जेव्हा एकत्र निवडून आलो तेव्हापासून आम्ही एकत्र काम करायला लागलो. राजीव गांधींच्या हत्यानंतर साहेब जेव्हा देशामध्ये संरक्षण मंत्री झाले तेव्हा नाईक साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादा हे राज्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. विधानसभेत आल्यानंतर अजित दादांनी कधीच मागे बघितला नाही. आठ वेळेला अजित दादा हे निवडून आले. पक्षाची जबाबदारी पार पडत असताना लहानातल्या लहान कार्यकर्त्याला व मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्याला ते भेटत असत. अजितदादांकडे आलेलं काम जे होण्यासारखे असेल तर लगेच करायचे. स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून ते काम करायचे. काम होण्यासारखं असेल तर लगेच करायचं नसेल होत तर नाही म्हणून सांगायचे असे वळसे पाटील म्हणाले.

चाळीस-पन्नास वर्षाचा सहवास सोबत असताना पाच दहा मिनिटात ते सांगणं योग्य नाही. राज्य सरकारने सुद्धा त्यांना महापुरुषांच्या यादीत बसवलं आणि आज सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये महाराष्ट्र मध्ये शासकीय कार्यक्रम त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झालेला आहे. हा निर्णय या सरकारने घेतला त्याच्यामधून दादा अजरामर झाले दादांचा विचार आता लोकांमध्ये जात आहे. काही गोष्टी मनासारख्या घडतात काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. अजितदादांच्या हातून मोठं काम या महाराष्ट्राची सेवा घडली असती ते आपल्याला पाहायला मिळणार नाही, म्हणून त्यांच्या आठवण काढली त्यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

Source link