RCB vs SRH : आरसीबी वि. हैदराबाद सामन्यात विराट आणि हेडमध्ये वाद, तापलेल्या कोहलीचं भर मैदानात चॅलेंज; हँडशेकवेळी दुर्लक्ष, Video व्हायरल


virat kohli and travis head clash Video : आयपीएलमध्ये आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायजर्स हैदराबादसोबत पार पडला. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये वाद पाहायला मिळाला. नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या.

virat kohli and travis head clash
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यात विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात मैदानावरच जोरदार खटका उडाला. एसआरएचने हा सामना ५५ धावांनी जिंकला असला तरी, सामन्याच्या निकालापेक्षा कोहली-हेड यांच्या वादाची सर्वत्र चर्चा झाली. यांचा वाद इतक्यावरच मिटला नाही सामना संपल्यावर ज्यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हँडशेक करत होते त्यावेळी विराट कोहलीने हेडसोबत हात मिळवला नाही. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमका काय आहे वाद?

बेंगळुरू संघाची बॅटिंग सुरू असताना विराट कोहली हेडला बोलताना दिसला, त्याला तो थेट इशारे देऊन बोलत होता. कोहलीने त्याला बॉलिंग करण्याचं चॅलेंज भर मैदानात दिलं होतं. नेमकी या वादाला कशावरून सुरूवात झाली हे समजलं नाही पण हा विषय चांगलाच वाढला. कारण सामना संपल्यावर कोहलीने हेडसोबत हात मिळवला नाही. यावरून एक लक्षात येतं की कोहलीने हा विषय चांगलाच डोक्यात घेतला आहे.
Maharashtra TimesSRH vs RCB : आरसीबी हरली तरीही पॉइंट टेबलमध्ये टॉपला कशी? तिन्ही संघाचे 18 गुण, प्ले ऑफचं समीकरण जाणून घ्या

सामना संपल्यानंतरचा व्हिडीओ

जेव्हा सामना संपला त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडू हात मिळवत होते. त्यावेळी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहिले असेल की, कोहली अभिषेक शर्मासोबत हात मिळवतो पण त्यामागे असलेल्या ट्रॅव्हिस हेडकडे तो जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. हेड तिथेच थांबतो आणि पाहतो पण कोहली तसाच पुढे जात इशानसोबत हात मिळवतो. त्यामुळे आता नेमका कशावरून हा वाद झाला हे समोर आले नाही. पण याचे पडसाद प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये समोरासमोर आले तर पाहायला मिळू शकतात

Maharashtra TimesHardik Pandya : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्यावर बीसीसीआयकडून कारवाई, नेमकं काय कारण?

सामन्याचा धावता आढावा

या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २५५-४ धावा केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक ७९ धावा इशान किशन याने केल्या होत्या. पठ्ठ्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले होते. त्यासोबतच अभिषेक शर्मा ५६ धावा, क्लासेन ५१ धावा आणि शेवटला नीतीश कुमार रेड्डीने २९ धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीचा संघ २०० वर ऑल आऊट झाला. कॅप्टन रजत पाटीदार याची ५६ धावांची अर्धशतकी खेळी वाया गेली. त्यासोबतच वेंकटेश अय्यरने ४४ धावा आणि कृणाल पंड्याने नाबाद ४१ धावांची खेळी केली. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा