मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते वाशू भगनानी सध्या चर्चेत आहेत. त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्यांचा मुलगा अभिनेता वरुण धवन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘ कुली नंबर १ ‘ या चित्रपटाच्या रिमेकमुळं आपल्याला २७ कोटी रुपयांचं प्रचंड नुकसान सोसावं लागले होत, परंतु या नंतर वरुण धवननं साधी फोन करून चौकशी करण्याचीही तसदी घेतली नाही, असा खळबळजनक खुलासा भगनानी यांनी केला आहे.
दुबईमधून माध्यमांशी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत संवाद साधताना वाशू भगनानी यांनी धवन कुटुंबावर आपली नाराजी व्यक्त केली.
‘फक्त नावापुरता निर्माता होतो’
वाशू भगनानी यांनी सांगितलं की, ‘कुली नंबर १’ च्या रिमेकच्या वेळी संपूर्ण बजेट आणि खर्चाचं व्यवस्थापन डेव्हिड धवन यांच्या हातात होतं.
“मी या चित्रपटासाठी डेव्हिड धवन यांना जवळपास ७० कोटी रुपये दिले होते. मी केवळ नावापुरता निर्माता होतो, संपूर्ण प्रोडक्शन डेव्हिडजींनीच सांभाळलं होतं. पण दुर्दैवानं या चित्रपटामुळें माझे २७ कोटी रुपयांचं नुकसान झालं. या एवढ्या मोठ्या आर्थिक तोट्यानंतर वरुण धवननं एकदाही विचारलं नाही की, ‘अंकल तुमचे इतकं नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कशी करणार?'”
‘बिवी नंबर १’ च्या सिक्वेलचं आश्वासन हवंतच विरलं भगनानी यांनी पुढं सांगितलं की, करोनाच्या काळात डेव्हिड धवन यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ‘बिवी नंबर १’ चा सिक्वेल बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. या चित्रपटावर सहा महिनं कामही झालं, परंतु नंतर स्क्रिप्ट तयार नसल्याचं सांगून चित्रपट थांबवण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांतच डेव्हिड धवन यांनी निर्माता रमेश तौरानी यांच्यासोबत हातमिळवणी करून वरुण धवनला घेऊन नवा चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’ सुरू केला, ज्याचा ट्रेलर नुकताच काही तांत्रिक कारणांचं नाव देऊन पुढं ढकलण्यात आला आहे.
गाण्याच्या चोरीवरून न्यायालयात धाव या वादाचे मुख्य कारण म्हणजे वाशू भगनानी यांच्या मालकीच्या ‘बिवी नंबर १’ मधील प्रसिद्ध ‘चुनरी चुनरी’ या गाण्याचा वापर डेव्हिड धवन यांनी रमेश तौरानी यांच्या आगामी चित्रपटात वरुण धवनसाठी केला आहे. भगनानी यांच्या मते, त्यांच्या परवानगीशिवाय हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. या विरोधात भगनानी यांनी कोर्टात धाव घेतली होती.
धवन कुटुंबासोबतच्या या वादामुळं सध्या बॉलिवूड वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, अद्याप यावर डेव्हिड धवन किंवा वरुण धवन यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीए.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा